Burglary in Pune | आंबेगाव पठार परिसरात भरदिवसा घरफोडी; 10 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरात घरफोड्या (Burglary) सुरूच असून आज पुन्हा आंबेगाव पठार येथे भरदिवसा म्हणजे दोन तासासाठी घराला कुलूप लावून गेलेल्या एका फळ विक्रेत्याचे घर चोरट्यानी फोडत 10 लाख रुपयांचा ऐवज चोरला (looted Rs 10 lakh) आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरणं आहे.

याप्रकरणी किरण गायकवाड (वय 52) यांनी भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth police) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आंबेगाव पठार येथील स्वामिनागर भागात राहतात.
त्यांचा फळ विक्रीचा गाडा आहे.
भारती हॉस्पिटल परिसरात हे दुकान आहे.
काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून ते गेले होते.
यावेळी चोरटयांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला.
त्यानंतर बेडरुमध्ये घुसत कपाटातून दागिने आणि रोकड असा एकूण 9 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
ते परत 5 वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे आढळून आले.
यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी येथे धाव घेत पाहणी केली.
आता पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
सीसीटिव्ही नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मात्र शहरात एकूणच घरफोड्यांचा (Burglary) सुरू असणारा धुमाकूळ काही केल्या कमी होताना दिसत नसून, त्यामुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण आहेत.

Pune Crime News | कोथरूडच्या परमहंसनगरमध्ये 23 वर्षीय महिलेच्या गळयातील 50 हजाराचे दागिने हिसकावले

Gautam Adani Income | ‘बुलेट’च्या स्पीडनं संपत्तीत वाढ ! गौतम अदानी यांनी यावर्षी दररोज कमावले 2000 कोटी रुपये, ‘या’ कंपन्यांमुळे मोठी कमाई

संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘अहो, शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा’

Pune News | मुलगा होत नसल्याने आत्महत्येस केलं प्रवृत्त, माहेरच्यांनी पतीच्या घरासमोर जाळला महिलेचा मृतदेह, तिघांविरोधात FIR

आता एजंटची अजिबात गरज नाही, एका क्लिकवर जाणून घ्या PF संबंधिची महत्वाची माहिती

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांकडून My Pune Safe अ‍ॅपची निर्मिती, जाणून घ्या वैशिष्ट्ये अ‍ॅपचे फीचर

काय सांगता ! होय, पुणे महापालिकेनं ठेकेदाराला कामापुर्वीच दिला 90 टक्के अ‍ॅडव्हान्स, उलट-सुलट चर्चा

Web Title :  Burglary in Pune Daytime burglary in Ambegaon Plateau area; Lampas looted Rs 10 lakh