Burglary in Pune | नर्‍हे परिसरातील गोडाऊन फोडून 62 लाखाचा माल लंपास, सिंहगड रोड पोलिसांकडून एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – पुण्यात घरफोड्या (Burglary in Pune) करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच राडा घातला असून, नऱ्हेत (narhe) या चोरट्यांनी गोडाऊन (Godown) फोडून तबल 62 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पण पोलिसांनी या घरफोडीचा (Burglary in Pune) पर्दाफाश करत एकाला अटक (Arrest) केली आहे. Burglary in Pune | One arrested by Sinhagad Road police for breaking goods in Narrahe area worth of 62 lakh

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी शरद विठलं दारवडकर (वय 20, रा. वेल्हा) याला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) ऋषिकेश रवींद्र कापरे (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापरे वारजे माळवाडी परिसरात (Warje Malwadi Area) राहण्यास आहेत. नर्हे (Narhe) येथे ललवाणी मेटॅलिक्स प्रा.लि. (Lalvani Metallics Pvt Ltd;) आणि ललवाणी फेरो. ओलाईज लि. या कंपनीचे ऑफिस आहे. याठिकाणी फिर्यादी हे मॅनेजर (Manager) म्हणून नोकरी (Job) करतात. दरम्यान त्यांच्या ऑफिसमध्येच फेरोमोली, निकेल, ऑलोमीन्यूअम लॉच तसेच इतर साहित्य ठेवण्यात आले होते. हे साहित्य कोलकाता (kolkata) येथून ते आणतात आणि पुढे त्याची विक्री करतात. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या ऑफिसचे शटर उचकटून चोरट्यांनी येथील 62 लाख 52 हजार रुपयांचा माल चोरून नेला आहे. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. यानंतर कंपनी मालक व मॅनेजर यांनी कामगारांकडे विचारपूस करून नेमका माल किती गेला याची खात्री केली.

त्यानुसार उशिरा सिंहगड रोड पोलिसांकडे (Sinhagad Road Police) तक्रार केली.
चोरीची घटना कळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे (Sinhagad Road Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (Senior Police Inspector Devidas Gheware), सहाय्यक निरीक्षक थोरबोले, उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ व त्यांच्या पथकाने याठिकाणी धाव घेत पाहणी केली.
त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासले.
तर खबऱ्यामार्फत या चोरीचा दुसऱ्याच दिवशी पर्दाफाश केला.
त्यानुसार शरद याला पकडले आहे.
शरद आणि त्याकॅब्या साथीदारांनी टेम्पो आणून गोडाऊन फोडत माल टेम्पोतून पळवला असल्याचे समोर आले आहे.
आता शरदच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
त्यांनी माल कुठे ठेवला आहे व ते कोणाला विक्री करणार होते.
याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरबोले हे करत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :- Burglary in Pune | One arrested by Sinhagad Road police for breaking goods in Narrahe area worth of 62 lakh

हे देखील वाचा

ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

TATA Group | ‘टाटा’ ग्रुपच्या ‘ताज’नं केली जगातील मातब्बर कंपन्यांवर मात

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती