महिलांच्या प्रसाधनगृहात शिरणाऱ्या पुरुषाला अटक

गोवा :  पोलीसनामा ऑनलाईन – पणजी येथील बसस्थांनकामधील महिलांच्या प्रसाधनगृहात बूरखा परिधान करुन गेलेल्या ३५ वर्षाच्या पुरुषाला पणाजी पोलीसांनी अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव विरगील बॉस्को फर्नांडिस असे आहे. ही घटना शनिवारी घडली.
सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ओरोपी विरगील ने जीन्स आणि टी-शर्टवर बुरखा घातला होता तसेच महिलांसारखे दिसण्यासाठी त्याने केसांचा विगही घातला होता.

मुस्लिम महिलेसारखा पोषाख करुन तो पणजीतील बसस्थानकांमधील महिला प्रसाधनगृहात गेला. याबाबत शंका आल्याने या संदर्भातील माहिती तेथून जाणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला महिला प्रसाधनगृहातून बाहेर येताच पकडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पणजी पोलिसांनी या प्रकरणी कलम ४१९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. त्याच्यावर मुस्लिम महिलेचा वेश परिधान करुन केटीसी बसस्थांनकांमधील महिलांच्या प्रसाधन, गृहात गेल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.