The Burning tempo ! मुंबई-बेंगलोर महामार्गावर एका धावत्या टेम्पोने अचानक पेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई – बेंगलोर महामार्गावर एका धावत्या टेम्पोने अचानक पेट घेतल्याची घटना सायंकाळी घडली. तो टेम्पो फूड प्रॉडक्ट घेऊन कोल्हापूराला निघाला होता. आगीत टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पण काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

कळंबबोली येथून फूड प्रॉडक्ट घेऊन टेम्पो कोल्हापूर येथे जात होता. तो टेम्पो महामार्गावरील माई मंगेशकर रुग्णालयाच्या जवळ आल्यानंतर अचानक टेम्पोचे ब्रेक लागत नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी चालकाने टेम्पो थांबला आणि पाहिले असता टेम्पोतून धूर येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. काही क्षणातच त्याने पेट घेतला. नागरिकांनी तात्काळ ही माहिती वारजे माळवाडी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत आगीने टेम्पोला विळखा घातला होता. अग्निशमन जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. मात्र आगीत टेम्पो जळून खाक झाला होता.

सायंकाळच्या वेळी हा प्रकार घडल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आग आटोक्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत केली. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

You might also like