किरकोळ वादातून बदलापूरमध्ये एकाला जिवंत जाळले

पोलिसनामा ऑनलाईन – किरकोळ वादातून एकाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे गंभीररीत्या होरपळलेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. चंद्रकांत पवार (48) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी निखिल गुरव याला अटक केली आहे. आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोणे येथील विश्वनाथ अपार्टमेंटमध्ये चंद्रकांत पवार राहत होते. त्यांची मुलगी वीज बिल घेण्यासाठी संकुलातील सी विंग या इमारतीत गेली होती. तेथे तिचा प्रमिला गुरव यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रमिला यांचा मुलगा निखिल 10 सप्टेंबरला सायंकाळी चंद्रकांत यांच्या घरी गेला. तेथे त्याने चंद्रकांत यांच्या पत्नी आणि मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. चंद्रकांत यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताच आरोपी निखिल याने त्यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. गंभीररीत्या होरपळलेल्या चंद्रकांत यांना वांगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like