‘हैदराबाद’, ‘उन्नाव’ आणि आता ‘पश्चिम बंगाल’मध्ये तरुणीची जाळून ‘हत्या’, बलात्कार झाल्याचा ‘संशय’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – हैदराबाद, उन्नाव यानंतर आता आणखी एक अशीच दुदैवी घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये एका तरुणीचा जळालेला मृतदेह मिळाला आहे. अजून मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आला नाही परंतू अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की बलात्कार करुन तरुणीची हत्या करण्यात आली.

पोलीस उपाधीक्षक प्रशांत देवनाथ यांनी सांगितले की मृतदेह क्रुर पद्धतीने जाळण्यात आला आहे. त्यामुळे तरुणीची ओळख पटवणे अवघड झाले आहे. पोलीस अधीक्षक आलोक राजौरिया यांच्याबरोबर घटना स्थळावर पोहचलेल्या पोलीस उपाधीक्षकांनी सांंगितले की स्थानिकांनी हा मृतदेह इंग्लिश बाजार पोलीस स्थानकांच्या हद्दीत आज सकाळी पाहिला. पुढील तपास सुरु आहे.

प्राथमिक दृष्या असे दिसत आहे की तरुणीचे वय जवळपास 20 – 22 वर्ष असावे. पोलिसांनी सांगितले की मृतदेहावर कोणतेही व्रण नाहीत. शवविच्छेदनासाठी मृतदेह मालदा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले की प्राथमिक तपासातून असे संकेत मिळत आहे की बलात्कारानंतर तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाजवळ एक जोडी चप्पल आणि काही माचिस मिळाल्या आहेत.

ही घटना हैदराबादमध्ये महिला डॉक्टरावर बलात्कारानंतर हत्या केल्याच्या घटनेनंतर समोर आली आहे. बिहारच्या बक्सर आणि उत्तरप्रदेशच्या संभल मध्ये देखील अशाच घटना ताज्या आहेत. गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार पीडिता एका तरुणीला आरोपींसह पाच जणांद्वारे जाळून मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली.

Loading...
You might also like