बेकरी जळीतकांड – जखमींपैकी एका कामगाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मोमीनपुरा येथे बेकरीमध्ये आग लागून गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास चांद चौकातील बेस्ट बेकरीमध्ये भीषण आग लागली होती. त्यात दोन कामगार घाबरून बाथरुममध्ये लपल्याने ते दोघे भाजले होते व गुदमरले होते.

विनोदकुमार सरोज (३१) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर मोहम्मद अशपाक लाडला (२१) याची प्रकृती आता स्थिर असल्याचे ससून रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अजय तावरे यांनी सांगितले.

बुधवारी सायंकाळी गंज पेठेतील मोमीनपुरा येथील चांदतारा चौकातील बेस्ट बेकरीमध्ये भीषण आग लागली. या घटनेत दोन्ही कामगार आत अडकले होते. अग्निशमनच्या २ फायरगाड्या, ३ वॉटर ब्राऊझर(जंबो टँकर) , २ रुग्णवाहिकासह अधिकारी व जवान दाखल झाले. त्यांनी आग तात्काळ आटोक्यात आणली. त्यावेळी दोघे कामगार घाबरून बाथरुममधे लपल्याने किरकोळ भाजले व गुदमरले होते. अग्निशमनच्या पथकाने त्याना बाहेर काढून दोघांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील विनोदकुमार सरोज याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मोहम्मद अशपाक लाडला याची प्रकृती आता स्थीर आहे.

Loading...
You might also like