Burning Bus In Pune | पुण्यातील चांदणी चौकात पीएमपी बसला भीषण आग; विझवताना भडका उडाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी जखमी (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Burning Bus In Pune | पुण्यात बावधन (Bavdhan) येथे पीएमपीएमएल बसने (PMPML Bus) भररस्त्यात अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) कोथरुड (Kothrud) आणि पाषाण (Pashan) येथील दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारुन आग विझवली आहे. दरम्यान, आग विझवताना भडका उडाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरुडकर (Gajanan Pathrudkar) हे जखमी झाले आहेत. (Burning Bus In Pune)

 

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

 

 

पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौकात (Chandni Chowk Kothrud) बसने अचानक पेट घेतला. ही घटना आज (रविवार ) दुपारी 2.09 सुमारास घडली. बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कोथरुड आणि पाषाण अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवत असताना अचानक भडका उडाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरुडकर हे जखमी झाले. त्यांना तातडीने चेलाराम हॉस्पिटलमध्ये (Chelaram Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सुर्या हॉस्पिटलमध्ये (Surya Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Burning Bus In Pune)

 

 

बसने पेट घेतल्याच्या वेळी बसमध्ये किती प्रवासी प्रवास करत होते.
आणि ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.
अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बसला लागलेली आग विझवली आहे.
सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

कोथरुड, चांदनी चौक येथे बसला लागलेली आग विझवताना कोथरुड अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर यांना कर्तव्य बजावताना चेहरा व हाताला भाजले असून (अंदाजे 20/25 टक्के) त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या प्रकृती स्थिर असून संबंधित अधिकारी पाथ्रुडकर यांचा आज वाढदिवस (वय 54) आहे.

 

Web Title :- Burning Bus In Pune | A PMPML bus catches fire in Chandni Chowk Kothrud on Sunday Afternoon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा