Burning Bus In Pune | वाढदिवसापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे ! आग विझवताना कोथरुड अग्निशमन दलाचे अधिकारी गंभीर जखमी; गजानन पाथरुडकर ICU मध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Burning Bus In Pune | पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौकात (Chandni Chowk Kothrud) आज (रविवार ) दुपारी अचानक पीएमपी बसने पेट (Burning Bus In Pune) घेतला. आग लागल्याचे समजताच कोथरुड आणि पाषाण (Pashan) अग्निशमन दलाच्या दोन गाड्या (Pune Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवत असताना कोथरुड अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरुडकर Gajanan Pathrudkar (वय-54) हे गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पाथरुडकर यांचा आज वाढदिवस (Birthday) आहे.

 

पेट घेतलेल्या बसवर पाण्याचा फवारा मारत असताना अचानक भडका उडाला. यामध्ये गजानन पाथरुडकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने चेलाराम हॉस्पिटलमध्ये (Chelaram Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सुर्या हॉस्पिटलमध्ये (Surya Hospital) दाखल करण्यात आले. त्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला भाजले आहे. या घटनेत ते 20 ते 25 टक्के भाजल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Burning Bus In Pune)

 

 

पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौकात बसने अचानक पेट घेतला. ही घटना आज (रविवार ) दुपारी 2.09 सुमारास घडली. बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कोथरुड आणि पाषाण अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवत असताना अचानक भडका उडाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरुडकर हे जखमी झाले.

 

बसने पेट घेतल्याच्या वेळी बसमध्ये किती प्रवासी प्रवास करत होते.
आणि ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.
अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बसला लागलेली आग विझवली आहे.
सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Web Title :- Burning Bus In Pune | Duty is more important than birthday! Kothrud firefighters seriously injured in firefighting; Gajanan Pathrudkar in ICU

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा