‘अजब’ प्रेमाची ‘गजब’ कहाणी, स्वतःला पेटवून गर्लफ्रेन्डला केलं ‘प्रपोज’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेमी आपल्या प्रेयसीला पटवण्यासाठी काय करत नाही. परंतु लंडनमधील एका व्यक्तीने आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी काय केले, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. यूकेमध्ये राहणाऱ्या स्टंटमॅन रिकी ऍशने आपल्या प्रोफेशननुसार, आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी धोकादायक मार्ग अवलंबला. स्वतःच्या शरीराला आग लावून आणि गुडघ्यावर बसून आपल्या प्रेयसीला प्रपोज केले. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, स्टंटमॅन रिकीने आपली मैत्रीण कॅटरिना डॉबसनशी लग्न करण्यासाठी ही पद्धत वापरली. एक प्रोफेशनल स्टंटमॅन असल्याने त्याने हे करण्यापूर्वी सर्व तयारी केली होती, त्यामुळे आगीमुळे त्याचे कोणतेही नुकसान झाले नाही. व्हायरल होत असलेल्या रिकीच्या व्हिडिओमध्ये तो आग लावण्यापूर्वी त्याच्या बचावासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची तयारी करताना दिसत आहे.

मग त्याच व्हिडिओमध्ये तो शरीराला आग लावून आपल्या मैत्रिणीसमोर गुडघे टेकून बसलेला दिसत आहे. प्रपोज केल्यावर एक व्यक्ती तिथे येऊन रिकीच्या कपड्यांवर लागलेली आग विझवतो. रिकीची मैत्रीण कॅटरिना व्यवसायाने नर्स आहे आणि दोघेही ऑनलाइन भेटले होते. तर रिकी गेल्या २७ वर्षांपासून स्टंटमॅन म्हणून काम करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like