द बर्निंग मोटर सायकल… अचानक दुचाकीला लागली आग

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – बारा पत्थर चौकाजवळील पट्रोल पंपाजवळ अचानपणे मोटरसायकलला आग लागली. आग लागताच मोटरसायकल रस्त्यावरच पेटती सोडून मोटरसायकलस्वार बाजुला पळाले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

पेटती मोटरसायकल विझवविण्यासाठी रस्त्यावरील गँरेजमधील तरुण व पंपावरील कर्मचारी मोठ्या हिंमतीने पुढे सरसावत पावडर युक्त असलेले आग रोधक सिंलेडरच्या सहायाने आग अटोक्यात आणली. ही आग अटोक्यात आल्याचे सगळ्यांचे लक्षात येताच तेथील नागरीकांनी सुटकेचा श्वास घेतला. सुदैवाने मोठी हानी टळली. यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
आग वायरच्या शॉकसर्कीटमुळे लागली असल्याची चर्चा परीसरातील नागरीकांत रंगलेली होती.