सतत येत असेल ढेकर, तर व्हा सावध, होऊ शकतात ‘या’ 3 समस्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जेवताना ढेकर देणे डायनिंग एटिकेट्सच्या विरूद्ध तर आहेच, सोबतच सामान्यपणे यास चांगले मानले जात नाही. मात्र, जेवल्यानंतर ढेकर येणे ही अतिशय सामान्य प्रतिक्रिया आहे. जेवताना घासासोबत जी हवा अन्ननलिकेत जाते तिच ढेकरसोबत तोंडातून बाहेर येते. ढेकरच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी छोटे-छोटे घास घ्या, आणि हळुहळु चावून खा. यामुळे जेवण सहज पचते. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि यास एरोफेजिया म्हणतात. परंतु जेव्हा सतत ढेकर येऊ लागतील, तेव्हा याचा संबंध गंभीर समस्यांशी असू शकतो. सतत ढेकर येणे कोणत्या समस्यांचे संकेत आहे ते जाणून घेवूयात.

होऊ शकतात या समस्या

1 इरिटेबल बाऊल सिंड्रोम

सतत ढेकर येणे हा इरिटेबल बाऊल सिंड्रोमचा संकेत असू शकतो. यामध्ये पोटात हलकी वेदना होत राहाते, मन अस्वस्थ राहाते, डायरिया आणि पॉटी करण्यात समस्या असा त्रास होतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

2 अपचन

अनेकदा जेवणाचे पचन होत नाही यामुळे अ‍ॅसिडिटी होते. हे सुद्धा सतत ढेकर येण्याचे एक कारण आहे. यासाठी पालेभाज्यांचे सेवन करा. फायबर जास्त असलेल्या गोष्टींचे जास्त सेवन करा.

3 डिप्रेशन, कामाचा ताण

वाढते वर्क प्रेशर, डिप्रेशन किंवा एखाद्या गोष्टीवरून सतत चिंतेत राहिल्याने सुद्धा असे होऊ शकते. सुमारे 70 टक्के लोकांमध्ये डिप्रेशन किंवा मूड स्विंगमुळे ढेकरची समस्या समोर येते. योग्यवेळी उपचार केला नाही तर डिप्रेशन वाढू शकते.