चाळीसगाव रोड महामार्गावर बस अपघात, 14 प्रवासी जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – चाळीसगाव रोड सुतगिरणी जवळ बसला अपघात होऊम 14 प्रवासी जखमी झाले. तसेच बसचे हजारोंचे नुकसान झाले.

सविस्तर माहिती की अमळनेर – परभणी बस धुळे स्थानकात आली. काही मिनिटांनी बस स्थानकातून प्रवासींना घेऊन पुढील प्रवासाठी मार्गस्थ झाली. बस चाळीसगाव रोड रेल्वे गेट ओलांडुन गरताड बारी जवळ बंद असलेल्या सुतगिरणी समोरील रस्त्यावर आली असता, पुढे चालणाऱ्या ट्रक चालकाने अचानपणे ट्रक रस्त्यावर थांबवला. यावेळी परभणी कडे जाणारी बस चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु बस ट्रकवर पाठीमागून जोरदारपणे आदळली दोघांत धडक झाली. या अपघातात बस मधील 14 प्रवासी जखमी झाले. यात तीन लहान मुलांनाही दुखापत झाली आहे. तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने सगळ्यांना उपचारार्थ चक्कर बर्डी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यावेळी महामार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

बस मधील जखमी प्रवासींची नावे

1) एकनाथ सिताराम वाणी (वय.74)
2) यमुनाबाई रविंंद्र पवार (वय.55)
3) सुनिल तुळशिराम वाणी (वय.40)
4) नंदा सुनिल वाणी (वय.30)
5) नवल सोनु चौधरी (वय 78)
6)शकुंतला वसंत पाटील (वय.55)
7) योगिता रमेश पाटील (वय.31)
8) आशाबाई अधिकार चौधरी (वय.35)
9) प्रमिला प्रेमचंद महाजन (वय.56)
10) अनिता अनिल वाडिले (वय.35)
11) आदित्य रविंद्र ठाकुर (वय 9)
12) सार्थ रमेश पाटील (वय 10)
13) नयन रमेश पाटील (वय.13)
14) सुमित अनिल वाडिले (वय.15)

बस मधील जखमी प्रवासींची माहिती कळताच डेपो मॅनेजर भगवान जगनोर, विभागिय वाहतुक अधिकारी किशोर महाजन, वाहतुक निरीक्षक घनश्याम बागुल, विभाग कार्यशाळा अधिक्षक हर्षल गोसावी यांनी रुग्णालयात भेट देऊन पहाणी करुन प्रत्येक प्रवासीला तातडीची मदत म्हणुन रोख 500 रुपयांची मदत केली.

Visit : Policenama.com