धुळे : दातर्ती गावाजवळ बस खड्यात उलटली महिला वाहक जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील साक्री डेपो बसचा दातर्ती गावा जवळ अपघात झाला.यात बस उलटली महिला वाहक जखमी. सविस्तर माहिती की साक्री डेपोतील बस क्रं. एम एच १४ / बी टी २७०९ साक्री ते नाशिक हि स्थानकातून गुरवारी नाशिक कडे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी बस मध्ये ६/७ प्रवासीसह प्रवास करते वेळी हि बस महामार्गाहून दातर्ती गावाजवळ रस्त्यावर पुढे जाताना रस्त्यात असलेला खड्डा वाचविण्याचा प्रयत्न चालक करत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटली. सुदैवाने मोठी हानी टळली.

अपघातात जिवीत हानी झाली नाही. बस उलटल्याने बस चालकासमोरील दोन्ही काचा तुटल्या त्यातूनच प्रवासी व वाहक हे बाहेर आले. वाहक मनिषा देवरे यांना डोक्याला मार लागल्याने त्या जखमी झाल्या आहे. त्यांना उपचारार्थ ग्रामिण रुग्णालयात भरती केले आहे. अपघाता नंतर काही तासांनी क्रेनच्या मदतीने खड्यात पडलेली बस उभी करुन बाहेर काढण्यात आली. यामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like