कंटेनरच्या धडकेत एसटी बस पलटून युवती जागीच ठार, दोन जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगातील कंटेरने दिलेल्या धडकेत एसटी बस पलटी होऊन युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. नगर-कल्याण रस्त्यावरील नेप्ती बायपास चौकात आज दुपारी चार वाजता हा अपघात झाला. सुचित्रा परमेश्वर बडे (रा. सारसनगर, नगर) हे मयत युवतीचे नाव आहे. बसमधील आणखी दोन जण जखमी झाले आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पारनेर येथून नगरच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसला नेप्ती बायपास चौकात एमआयडीसीकडून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरने जोराची धडक दिली. या धडकेत बस पलटी झाली बसखाली सापडून आतील सुचित्रा बडे हिचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी दोन-तीन प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुचित्रा बडे या नेप्ती येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयातून घरी येत असताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा हा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही होईल.

 ‘किडनी’ फेल्युअर होऊ नये म्हणून करा ‘या’ उपाययोजना

 ‘अंडरआर्म डार्कनेस’ दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय

 तजेलदार त्त्वचेसाठी ‘टोमॅटो’ उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

 ‘या’ ५ सवयी लावून घ्या, तुम्ही वारंवार पडणार नाहीत आजारी

 भाज्यांच्या सालीमध्ये सुद्धा असतात औषधी गुण, करा ‘हे’ उपाय

 दुखणे कमी करण्यासाठी औषधांशिवाय ‘हे’ उपायदेखील लाभदायक

Loading...
You might also like