पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लक्झरी बसला अपघात ; २ ठार ४० जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लक्झरी बस पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४० प्रवाशी जखमी झाले. हा अपघात आज माडप बोगद्याजवळ झाला. शर्मा ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना पावसामुळे रस्ते ओले झाल्याने बस उलटली. वाहन चालकांना वाहने सावकाश चालवण्याच्या सुचना देऊनही वाहन चालकांकडून वेगाचे भान राखले जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात होतात. ही बस वेगात असल्याने उलटली असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या अपघातात मृत झालेल्या प्रवाशांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तर मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

दरम्यान, हा अपघात बोगद्यामध्ये झाल्याने वाहतूक कोंडी झाली. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला.

आरोग्य विषयक वृत्त – 

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे

हार्ट अटॅक अनेकदा सकाळीच का येतो? बचावाचे उपाय