चोरी करून जाळलेल्या बसचे गूढ १ महिन्यानंतर उघड ; ३ जण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. ६०८/२०१९ भा.द.वि. कलम ४३५,३७९ दि २४/०६/१९ रोजी सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे काळू मुकुंद शिंदे वय २३ वर्षे रा- शिक्रापूर ता हवेली जि पुणे यांनी तुळापूर फाटा येथून टाटा कंपनीची बस क्र MH ०६ S ७७९८ ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेवून जाळून नुकसान केलेबाबत फिर्याद दिली होती.

म्हणून डी बी पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली असता काहीही सुगावा अगर धागेदोरे मिळून आले नव्हते. गेल्या १ महिन्यापासून सदर गुन्ह्याचा कसून तपास करीत असताना दि. १९/०७/२०१९ रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तसेच तांत्रिक कौशल्याने तपास करून या गुन्हयात आरोपी नामे १) गणेश लक्ष्मण घायाळ वय २३ वर्षे रा. पेरणे टोलनाक्याजवळ लोणीकंद, २) गोपाळ लक्ष्मण घायाळ वय १९ वर्षे रा. पेरणे टोलनाक्याजवळ लोणीकंद, ३) मोहित संजय साळवे वय १९ वर्षे रा. धानोरे, मरकळ रोड, आळंदी यांना गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.

वरील आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी हे कृत्य जुन्या अंतर्गत वादातून रागाच्या भरात कट रचून केल्याचे कबूल केले असून वरील बस चोरी करून खंडोबा माळ लोणीकंद येथे आणून डिझेलच्या सहाय्याने जाळून पळून गेले हे उघड झाले आहे. वरील आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या ०२ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

डॉ. सई भोरे-पाटील मॅडम (उप विभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत (पोलीस निरीक्षक- गुन्हे) यांनी डी बी पथकाच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आले आहे. सदर कारवाई ही गुन्हे शोध पथक- पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार दत्ता गायकवाड हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त