खंडाळा घाटात बस अपघातात 5 जण ठार; 24 जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे -मुंबई महामार्गावरील बोरघाटात खासगी बसचालकाचा ताबा सुटल्याने बस सुमारे ६० फुट खोल दरीत कोसळून त्यात ५ जण ठार झाले. बसमधील २४ प्रवासी जखमी झाले असून हा अपघात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. मृतांमध्ये दोन वर्षाच्या मुलासह दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहिती नुसार (एमएच 04 एफके 1599) ही खाजगी प्रवासी बस कराडहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस वेला लागूनच असलेल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गारमाळ घाटातून खाली उतरत असताचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व बस रस्ता सोडून काहीशी खोल दरीत गेली. यामुळे झालेल्या अपघातात गाडीमधील एक लहान मुलीसह चार जणाचा मृत्यु झाला तर 24 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीपैकी 13 जणांना गंभीर स्वरुपाचा मार लागला आहे.

मयतांची नावे –
सर्वज्ञा सचिन थोरात (वय 3, रा. कराड), स्नेहा जनार्दन पाटील (वय 15, रा. घाटकोपर), जनार्दन पाटील (वय 45, रा. घाटकोपर), संजय शिवाजी राक्षे (वय 50, रा. पवई) व प्रमिला रामचंद्र मोहिते (वय 50, रा. बेलवले बु. कराड) अशा पाच जणांचा या अपघातात मृत्यु झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून बसमधील गावकऱ्यांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढून मिळेल, त्या वाहनाने कामोठेच्या एमजी एम, खोपोली रुग्णालय, पवना रुग्णालय आणि लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बसविषयी पोलीस माहिती घेत असून चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Visit : Policenama.com