नाशिक जव्हार रोडवर बस दरीत कोसळली ; ४ ठार तर ४५ गंभीर जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक जव्हार रोडवर मोखाडा घाटात खाजगी बस दरीत कोसळली आहे. या अपघातात ४ जण ठार तर ४५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस शिर्डी दर्शन करून डहाणूकडे जात होती. बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी हे गुजरातमधील आहेत. शिर्डी दर्शन करून ही बस डहाणूकडे जात असताना नाशिक जव्हार रोडवर ही बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये ४ भाविक ठार तर ४५ जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि इतर बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून बचाव कार्य सुरू आहे.