कडक सॅल्यूट ! 56 प्रवाशांचा जीव वाचवून ‘त्या’ ड्रायव्हरनं केली नावाला साजेशी ‘कामगिरी’, अखेर सोडले प्राण

कन्नौज : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील एका बस ड्रायव्हरनं शेवटच्या श्वासापर्यं त्याचं कर्तव्य निष्ठेनं बजावलं आहे. कन्नौज जिल्ह्यातील ही घटना आहे. हा ड्रायव्हर चक्क मृत्यूच्या दारात उभा होता. परंतु तरीही त्यानं प्रवाशांना आधी सुखरूप केलं आणि त्यानंतरच त्यानं जीव सोडला.

नेमकं काय घडलं ?

आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वे वरून प्रवाशांना घेऊन जाताना बसच्या ड्रायव्हरला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. चालत्या बसमध्ये हा प्रकार घडल्यानं सारेच घाबरले होते. यावेळी बसचा ड्रायव्हर संतराजरामनं प्रसंगावधान राखत बस कशीतरी रस्त्याच्या कडेला थांबवली दरवाजा उघडून तो गाडीच्या बाहेर पडला आणि काही वेळातच रक्ताच्या उलट्या करून ड्रायव्हरनं प्राण सोडले. नावेला साजेसं असंच काम त्यानं केलं.

नेमकी कुठे घडली घटना ?

या बसमध्ये एकूण 56 प्रवाशी होते. आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर जौनपूरहून दिल्लीला जात असलेल्या रोजवेज बसमधील ही घटना आहे. आपल्यावर संकट आल्याचं समजताच ड्रायव्हर संतराजरामनं आपला ड्रायव्हरकीचा धर्म अचूक निभवला.

परिचालकानं सांगितला वृत्तांत

बसचे परिचालक दीपक कुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, 56 प्रवाशांना घेऊन ही बस जौनपूरच्या शाहगंज येथून दिल्लीसाठी रवाना झाली होती. काही वेळी ही बस लखनऊमध्ये थांबली होती. यानंतर आम्ही कन्नौजला पोहोचलो. ही बस कन्नौज सौरिख भागात आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर ताशी 65 ते 70 किमी वेगानं धावत होती. अचानक ड्रायव्हरनं ब्रेक लावला आणि बस थांबवली. त्यानं दरवाजा उघडताच रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. यानंतर लगेचच त्यानं जीव सोडला.