धुळे : गळक्या लाल परी बसमुळे प्रवाशांचे हाल

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली. परंतू आज (दिनांक २०) अचानपणे वातावरणात बदलून शनिवारी दुपारी पावसान दमदारपणेे हजेरी लावली. यात धुळे ते साक्री बस क्रं.एम एच २० बी एल १५९५ हि बस साक्री स्थानकातून सायंकाळी पाऊस असताना धुळ्याकडे येत असताना पावसाचे पाणी छतावर बरसू लागले.

हे बरसणारे पाणी बसचा पञा सडल्याने ते छताद्वारे कुजलेल्या पञ्यातून वाट काढत बस मध्ये सिटावर बसलेल्या प्रवासीच्या अंगावर पावसाचे पाणी पडून ते चिंब ओले होत होते. यामुळे प्रवासी हैराण झाले. त्यांंनी चक्क काही सिट रांगा मोकळ्या करुन टाकल्या पावसाचे पाणी सिट ओले करुन आत हि पाणी साचल्याने प्रवासी ञस्त झाले.

काही प्रवासांनी उभे राहत प्रवास केला. ५० कि.मी.चे अंतर पार केले. पावसाच्या पाण्यामुळे प्रवासीचे हाल झाले. गळक्या बससेची दुरुस्ती करुनच त्या मार्गावर धावल्या पाहिजे. अशा संतप्त प्रतिक्रीया काही प्रवासींनी व्यक्त केल्या. बस प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आरोग्यविषयक वृत्त