बस प्रवाशांच्या बॅगा आणि किंमती ऐवज लंपास करणारा सराईत अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एसटी, टुरिस्ट बस, तसेच पीएमपी प्रवासादरम्यान प्रवाशांच्या बॅगा आणि किंमती ऐवज चोरणाऱ्या सराईतला गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ९७ ग्रॅम सोन्याचे दागिने व ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यता आला आहे.

महिपाल उर्फ मनिष रामगोपाल सिंग (३६, उंड्री, मुळ, कांगडी ता. जि. हरिद्वार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे युनीट तीनचे पथक स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहरात बसमध्ये प्रवाशांचा ऐवज चोरी करणारा महिपाल सिंग हा स्वारगेट एस टी स्टॅंड परिसरात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी एस. टी. स्टॅंड परिसरात सापळा रचला. त्यावेळी महिपाल याला पकडले. त्यानतंर त्याच्याकडे तपास केल्यावर त्याने गर्दीच्या वेळी शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन, या परिसरात एसटी बस, टुरिस्ट बस, पीएमपी बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या बॅगा व किंमती ऐवज लंपास केल्याचे कबूल केले.

त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर त्याच्याकडून ९७ ग्रॅम सोन्याचे दागिने, व रोख रक्कम एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने जनता वसाहत येथील भारती काकडे यांचे दागिने व पर्स स्वारगेट एस टी स्टॅंड परिसरातून चोरले असल्याचे तपासात समोर आले. त्याच्याकडून स्वारगेट पोलीस ठाण्यातील ६, शिवाजीनगर ४, बंडगार्डन ४, विश्रामबाग ४, वारजे माळवाडी व दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल प्रत्येकी १ असे १९ गुन्हे उघडकिस आणले आहेत. तो स्वारगेट पोलीस ठाण्यात २०१४ साली दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात स्वारगेट, बंडगार्डन, पोलीस ठाण्यात प्रत्येकी २, तर दत्तवाडी पोलीस ठाण्यात एक गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम, पोलीस उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, संजय गायकवाड, सहायक पोलीस फौजदार दीपक मते, किशोर शिंदे, दत्तात्रय गरुड, कर्मचारी संतोष क्षीरसागर, मच्छिंद्र वाळके, रोहिदास लवांडे, शकिल शेख, गजानन गणबोटे, मेहबुब मोकाशी, रामदास गोणते, संदिप राठोड, अतुल साठे, संदिप तळेकर, विल्सन डिसोजा, सचिन गायकवाड, बनसोडे यांच्या पथकाने केली.

ह्याहि बातम्या वाचा –

 

डॉ. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर सस्पेन्स कायम ; दिल्लीत घडामोडीला वेग

‘सलग १४ निवडणुका जिंकणाऱ्या पवार साहेबांना युतीच्या फुसक्या वाऱ्याची भीती नाही’

पबमध्ये विवाहितेला छेडले, व्यावसायिकांची जेलमध्ये रवानगी

लोकसभा निवडणूक २०१९ : आठवलेंवर अन्याय होऊ देणारा नाही : मुख्यमंत्री

निर्मला सीतारामन यांनी आचारसंहितेचा असा सहन केला तोटा