नाशिकमध्ये ST बस आणि रिक्षाची ‘टक्कर’, दोन्ही वाहने ‘खोल’ विहिरीत पडली, 20 जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

नाशिक/देवळा : पोलीसनामा ऑनलाइन – बस आणि अ‍ॅपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 20 झाली असून 20 जण जखमी झाले आहेत. सर्व मृत व्यक्ती बसमधील प्रवासी आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. ही घटना आज (मंगळवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरु आहे.


मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात असताना या बसला अपघात झाला. कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. बसचे टायर फुटल्याने बसने रिक्षाला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातानंतर बस रिक्षासह विहिरीत कोसळली. धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेल जवळ हा भीषण अपघात झाला आहे. बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

नाशिकमध्ये ST बस आणि रिक्षाची 'टक्कर', दोन्ही वाहने 'खोल' विहिरीत पडली, 20 जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

नाशिकमध्ये ST बस आणि रिक्षाची 'टक्कर', दोन्ही वाहने 'खोल' विहिरीत पडली, 20 जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

Geplaatst door Policenama op Dinsdag 28 januari 2020

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर 5 क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात आली आहे. बसमध्ये 43 प्रवासी होते आणि यामध्ये 7 मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना मालेगाव देवळा तर काहींना उमराणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचलेल्या महिलांची प्रतिक्रिया
हा अपघात दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. अपघात झाला त्यावेळी नेमके काय घडलं याबद्दल समजलच नाही. फक्त बस विहिरीकडे जाताना दिसली. नेमकं काय होतंय हे काहीच कळलं नाही. विहिरीमध्ये बस पडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. लहान-लहान मुलं होती. सगळेच आपला जीव वाचवण्यासाठी ओरडत होती. मी कशी बशी खिडकीला पकडून बाहेर आले अशी प्रतिक्रिया या अपघातातून बचावलेल्या एका महिलेने वृत्तवाहिनीला दिली आहे.

You might also like