इजिप्तमध्ये भारतीय पर्यटकांच्या बसला भीषण अपघात, 6 ठार तर 24 जण जखमी

इजिप्त : वृत्तसंस्था – इजिप्तमध्ये पर्यटकांच्या बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या पर्यटकांपैकी एक भारतीय पर्यटक, दोन मलेशियन महिला पर्यटक आणि इजिप्तच्या तीन नागरिकांचा समावेश आहे. तसेच २४ जण जखमी अवस्थेत आहेत.

या अपघाताबाबत भारतीय दूतावासकडून मिळालेली माहिती अशी की, एका ट्रकने पर्यटकांच्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात ६ लोकांचा मृत्यू झाला असून २४ जण गंभीर जखमी आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये सुरक्षा रक्षक, टूर गाईड आणि चालक यांचा समावेश असून जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. हा भीषण अपघात इजिप्तच्या सोखनाजवळ झाला आहे.

भारतीय दूतावासाने ट्विटरद्वारे या भीषण अपघाताची माहिती दिली आहे. त्यांनी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना ट्विटरवर टॅग करून ही माहिती दिली. या अपघातात एका भारतीय पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

भारतीय दूतावासाने परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना ट्विटरवर टॅग करून एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांना या भीषण अपघाताची माहिती दिली आहे. इजिप्तच्या सोखनामध्ये रविवारी भारतीय प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका बसला दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातात एका भारतीय पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर भारतीय दूतावासाकडून 20-1211299905 आणि 20-1283487779 हे दोन हेल्पलाइन नंबर्स जारी करण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/