बसमध्ये चढताना महिलेच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेचे मंगळसुत्र चोरले. ही घटना साक्री बस स्थानकात घडली. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवकाबाई सुभाष नहिरे (रा. गोपाळ नगर, पिंपळनेर) आणि त्यांची सून योगिता नहिरे या साक्री गावातील नातेवाईकांच्या गाठीभेटी घेऊन पुढील प्रवासासाठी साक्री बस स्थानकात आल्या होत्या. दुपारच्या वेळी धुळे येथे जाण्यासाठी सुरत-औरंगाबाद बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी योगिता नहिरे यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरले. योगिता यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत चोर लंपास झाला होता. त्यानंतर त्यांनी पुढील प्रवास रद्द करून साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –