‘दिल्ली पोलीस’च लावत होते बस गाड्यांना ‘आग’, उपमुख्यमंत्री सिसोदियांचा आरोप

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात दिल्लीत रविवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात तीन बसगाड्या जाळण्यात आल्या. अनेक कारची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिल्ली पोलिसांवर बसेसना आग लावल्याचा आरोप केला आहे. सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात पोलीस बसमध्ये जाऊन आत काही टाकत असल्याचे दिसत आहे. तसेच पोलीस कारची तोडफोड केल्याचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ टॅग करुन सिसोदिया यांनी टिष्ट्वट केले असून पहा, कोण बस आणि कार यांना आग लावत आहेत. हे फोटो म्हणजे दिल्लीत भाजपाने पोलिसांना हाताशी धरुन राजकारण खेळत आहे.

तसेच बसला आग लागण्यापूर्वी पोलिसांच्या वेशातील हे लोक कोण होते व बसच्या आत जाऊन पिवळ्या, पांढऱ्या रंगाच्या कॅनमधून बसमध्ये काय टाकत होते, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.त्यावर पोलीस प्रशासनाने हे पोलीस आग लावत नव्हते तर, आग विझवत असल्याचा खुलासा केला आहे. मात्र, त्यावेळी बसला कोठेही आग लागलेली दिसत नव्हती. फक्त तिच्यावर दगडफेक केल्याने चालकासमोरील काच तुटलेली दिसत आहे.

मात्र बसला कोठेही आग लागलेली दिसत नसताना या पोलिसांकडे कॅन कसे आले. जर पोलीस प्रशासन म्हणते, त्यानुसार जर ते आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. पण आग विझविण्यासाठी कॅन कधीपासून वापरले जातात. पोलिसांकडे असलेले कॅन आले कोठून आणि त्या कॅनमध्ये नेमके होते तरी काय?. असे अनेक प्रश्न या फोटो व व्हिडिओवरुन उपस्थित झाले आहेत. या फोटोत ज्या बसमध्ये पोलीस कॅनमधून आत काही वस्तू टाकत असल्याचे दिसते. त्याच्या मागे असलेल्या बसलाही आग लागलेली दिसत नाही. दुसरीकडे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांनी मोटारसायकलमधील पेट्रोल काढून बसवर टाकले़ त्यावेळी बसमध्ये प्रवासीही होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/