‘मास्टर ब्लास्टर’ सचिन पुन्हा एकदा मैदानात, ‘या’ सुंदर महिला क्रिकेटरच्या बॉलिंगवर ‘बॅटिंग’ करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा लिजेंड क्रिकेटर सचिन तेंडुलकर बुशफायर क्रिकेट बॅश चॅरीटी मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर एलिसा पेरीची एक ओवर खेळताना दिसणार आहे. बुशफायला प्रभावित लोकांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया चॅरिटी मॅचचं आयोजन करत आहे. यात पॉंटींग आणि गिलक्रिस्टच्या टीम असणार आहेत. ज्याची कप्तानी क्रमश: रिकी पाँटींग आण एडम गिलक्रिस्ट करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच एलिसा पेरीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सचिनला चॅलेंज दिलं होतं. यानंतर एलिसा पेरी आणि सचिन यांच्यात रोमांचक मुकाबला या पीचवर होणार आहे. पेरीनं म्हटलं होतं की, “हॅलो सचिन, तुम्हाला बुशफायर मॅचसाठी ऑस्ट्रेलियन लोकांसाठी उभं राहताना पाहून आनंद वाटत आहे. मला माहिती आहे की तुम्ही या मॅचच्या एका टीमला कोचिंग देत आहात. गेल्या रात्री एका मुलाखतीत आम्ही विचार करत होतो की, कसं वाटेल जर रिटायरमेंटनंतर तुम्ही डावातील ब्रेकदरम्यान माझी एक ओवर खेळलात तर ?”

एलिसाच्या या चॅलेंजला उत्तर देताना सचिन म्हटला होता की, “ऐकायला छान वाटतंय एलिस. मला तिथे यायला आणि एक ओवर खेळायला आवडेल. आशा आहे की या आयोजनातून आपण बुशफायर पीडितांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे एकत्र करू शकू आणि तू मला आऊटही करू शकतेस.”

बुशफायर क्रिकेट मॅचचं आयोजन मेलबर्न जंक्शन ओवल मैदानावर केलं जाणार आहे. या मॅचमधून जमा होणारी रक्कम ऑस्ट्रेलियन रैड क्रॉस डिसास्टर रिलीफ फंड रिकव्हरी फंडमध्ये पाठवली जाणार आहे.

हे आहेत दोन्ही टीमचे प्लेयर

रिकी पाँटींग प्लेईंग 11 – मैथ्यू हेडन, जस्टीन लँगर, रिकी पाँटींग(कर्णधार), एलिसे विलानी, ब्रायन लारा, फोबे लीचफील्ड, ब्रॅड हॅडिन(विकेटकीपर), ब्रेट ली, वसीम अकरम, डैन क्रिश्चियन, ल्यूक हॉज. कोच- सचिन तेंडुलकर

एडम गिलक्रिस्ट प्लेईंग 11 – एडम गिलक्रिस्ट (कर्णधार आणि विकेटकीपर), शेन वॉटसन, ब्रॅड हॉज, युवराज सिंह, एलेक्स ब्लॅकवेल, एंड्र्यु साईमंड्स, कर्टनी वाल्श, निक रिवोल्ड, पीटर सिडल, फवाद अहमद, कॅमरोन स्मिथ. कोच- टिम पेन.