बुरे दिन ! ‘आधार’कार्ड अपडेट करण्यासाठी आता चक्क मोजावे लागणार पैसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्वाचे आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ असो किंवा कोणतेही ओळखपत्र असो, आधार कार्ड खूप महत्वाची गोष्ट आहे. सरकारने हि आधार कार्ड सुरुवातीला मोफत दिली होती.

त्यानंतर आधार कार्ड तयार करणारी कंपनी UIDAI  हिने नुकतेच आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी नवीन नियमावली जारी केली. या नियमावलीनुसार आता तुम्हाला आधार कार्डवरील कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 1 जानेवारी 2019 पासूनचे शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही विशेष सेवांसाठीच तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे.

या गोष्टींसाठी भरावे लागणार शुल्क

1) जर तुम्हाला आधारकार्डवरील तुमचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, ई-मेल किंवा बायोमेट्रिक माहिती बदलायची असल्यास तुम्हाला यापुढे 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

2) कलर प्रिंट आऊट – eKYC म्हणजेच ऑनलाईन सिस्टीम वरून तुम्हाला A4 साइज कलर प्रिंट आउट पाहिज असेल तर तुम्हाला यासाठी 30 रुपये मोजावे लागणार आहेत.

  या सुविधा असणार मोफत

1) बायोमॅट्रिक अपडेट-
तुमच्या मुलांची मायोमेट्रिक माहिती अपडेट करायची असल्यास तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. हि सुविधा पूर्णपणे मोफत मिळणार आहे.

2) आधार कार्ड नोंदणी

अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र नवीन आधारकार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. नोंदणी पूर्णपणे मोफत असल्याची माहिती आधार बनविणाऱ्या कंपनीने दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त