खुशखबर ! बँक ऑफ महाराष्ट्रनं गृह, शिक्षण आणि वाहन कर्जावरील व्याजदरात केली कपात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशातील सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने (बीओएम) 8 जून, 2020 पासून आपल्या रेपोशी संबंधीत कर्ज दर (आरएलएलआर) 40 बीपीएसने घटवले आहेत. आरएलएलआर ला घटवून 7.05% केला आहे. आता सर्व रिटेल कर्ज (घर, शिक्षण, वाहन), एमएसएमईला कर्ज, जे आरएलएलआरशी संबंधीत आहेत, ते स्वस्त दरात उपलब्ध होतील. यामुळे रिटेल आणि एमएसएमई कर्जदारांना आणखी फायदा होईल.

बँकेने लागोपाठ तिसर्‍यात महिन्यात आपल्या निधी अधारित कर्ज दराची सीमांत किंमत (एमसीएलआर) सुद्धा कमी केली आहे. 8 जून, 2020 पासून सर्व कालावधीवर एमसीएलआर दर सध्याच्या स्तरावरून 20 बीपीएस कमी केला आहे. बँकेची ओवरनाईट, एक महीना आणि तीन महीन्याच्या एमसीएलआरला या कालावधीसाठी 7.20% (7.40% ने), 7.30% (7.50% ने) आणि 7.40% (7.60% ने) पर्यंत घटवण्यात आले आहे. सहा महिन्यासाठी, एमसीएलआर दरांना दुरूस्त करून 7.50% (7.70% ने घटवून) आणि एक वर्ष एमसीएलआर ला 7.70% (7.90% ने घटवून) करण्यात आले आहे.

बँकेचा एमसीएलआर कमी करण्याचा उद्देश, आर्थिक वृद्धी आणि औद्योगिक विकासाचे समर्थन करणे आणि दर प्रसारण ठरवणे हा आहे.