फायद्याची गोष्ट ! सोने खरेदीवर RBI कडून डिस्काऊंट, केवळ 5 दिवस मिळणार स्वस्त Gold

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सोन्याच्या सतत घसरणार्‍या किंमती दरम्यान स्वस्त सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. त्यातच आरबीआय आपल्याकडून ग्राहकांना सोन्याच्या खरेदीवर डिस्काऊंट सुद्धा देत आहे. सरकार पुन्हा एकदा सॉवरेन गोल्ड बाँड 2020-21 (Sovereign Gold Bond Scheme 2020-21 Series XII) घेऊन आले आहे. या अंतर्गत सोन्याची विक्री 1-5 मार्चच्या दरम्यान केली जाईल. सरकारने यासाठी बाँडची किंमत सुद्धा ठरवली आहे.

सॉवरेन गोल्ड बाँडचे नवीन जारी मूल्य 4,662 रुपये प्रति ग्रॅम ठरवण्यात आले आहे. येथे दहा ग्रॅमची किंमत 46620 रुपये आहे. बाँडचे मूल्य इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिडेट (IBJA) द्वारे देण्यात आलेल्या 999 शुद्धतेच्या गोल्डच्या सरासरी क्लोजिंग प्राईजच्या आधारावर ठरलेले आहे. हे गोल्ड बाँड 8 वर्षासाठी जारी केले जातात आणि 5 वर्षानंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय सुद्धा असतो. अर्जदार किमान 1 ग्रॅम आणि त्याच्या मल्टीपलमध्ये खरेदी करू शकतो.

मिळेल 50 रुपयांचे डिस्काऊंट

येथे तुम्हाला सोने खरेदीवर डिस्काऊंट सुद्धा दिले जात आहे. अर्थ मंत्रालयाच्या वक्तव्यात म्हटले आहे की, सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेशी विचारविनिमय करून ऑनलाइन खरेदी करणार्‍यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणुकदारांसाठी एक ग्रॅम सोन्याचा बाँड 4,612 रुपयांच्या दरावर जारी केला जाईल. दहा ग्रॅम सोने घेतल्यास ऑनलाइन किंमत 46120 रुपये असेल.

किती करू शकता गुंतवणूक

गोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणूक करणारा व्यक्ती एका व्यवहारी वर्षात कमाल 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकतो. गुंतवणुकदार किमान 1 ग्रॅम आणि कमाल 4 किलो पर्यंतसाठी गुंतवणूक करू शकतो. हिंदू अविभाजित कुटुंबासाठी 4 किलो आणि ट्रस्ट इत्यादीसाठी 1 व्यवहाराच्या वर्षात कमाल 20 किलोपर्यंत गुंतवणुकीची परवानगी आहे.