खुशखबर ! दसरा-दिवाळीपुर्वीच मोदी सरकारचं सरकारी नोकरदारांना ‘गिफ्ट’, घर खरेदी झाली ‘स्वस्त’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोठी घोषणा केली आहे. हाऊस बिल्डिंग अ‍ॅडव्हान्सवरील व्याजदर घटवण्यासोबतच ते 10 वर्षांच्या सरकारी सुरक्षा बाँडला जोडले जाणार आहेत. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर जे सरकारी कर्मचारी घर बनवणार आहेत त्यांना अ‍ॅडव्हान्सवरील व्याज दर स्वस्त होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांना घर खरेदी करणे स्वस्त होणार आहे.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार , सरकारी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी घर असते. या योजनेमुळे आता सरकारी कर्मचार्‍यांना स्वतःचे घर बनविणे स्वस्त होईल. परवडणारी आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांसाठी 10 हजार कोटीच्या विशेष निधी देण्यात येईल. सरकारशिवाय एलआयसीसारखे गुंतवणूकदारही अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतील. ज्या गृह प्रकल्पांची काम 60 टक्के पूर्ण झाली आहेत, अशा प्रकल्पांसाठी हा निधी वापरता येणार आहे . त्यासाठी हा प्रकल्प नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे एनपीए असावा.

गृहखरेदीसाठीच्या निधी करता स्पेशल विंडो –

परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ईसीबी गाइडलाइन्समध्ये दुरुस्ती करणार आहे. गृहखरेदीसाठीच्या निधी करता स्पेशल विंडो उघडण्यात येईल. त्यात तज्ज्ञ मंडळी काम करतील. त्यामुळे लोकांना घर घेण्यासाठी कर्ज मिळणं सोपं जाणार आहे.

ईसीबी गाइडलाइन्समध्ये दुरुस्ती करणार-

आतापर्यंत 1.95 कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा फायदा मिळाला आहे. तसेच 45 लाखाहून कमी किंमतीच्या घरांना परवडणाऱ्या घरांच्या योजनेत समावेश केल्यानेही अनेकांना फायदा झाला आहे. या योजनेचा अधिकाधिक लोकांना फायदा व्हावा म्हणूनच सरकार ईसीबी गाइडलाइन्समध्ये दुरुस्ती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like