पदक विजेत्या खेळाडूंना इकोनॉमी आणि अधिकाऱ्यांना मात्र बिझनेस क्लास तिकीट

जकार्ता : वृत्तसंस्था 

जकार्ता येथे झालेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली . ६९ पदकांची कमाई करत खेळाडूंनी अनेक विक्रमही मोडले.अनेक खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आशियाई स्पर्धेत पोहचलेले आहेत . त्यांच्या पदकाचे , कामगिरीचे तेवढ्यापुरते त्या दिवसापुरते तोंडभरून कौतुकही झाले. पण मायदेशी परतत असताना या पदक विजेत्या खेळाडूंना वेगळ्या वागणुकीचा अनुभव आला.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’282626ff-b0dd-11e8-bb67-2bd77a09aa03′]

मायदेशी परतत असताना खेळाडूंना इकोनॉमी क्लासमधून प्रवास करावा लागला, तर अधिकाऱ्यांनी बिझनेस क्लासमधून प्रवास केला. भारतीय पथकाचे उपप्रमुख आर के सचेती यांनी बिझनेस क्लासमधून प्रवास केला आणि त्याच वेळी खेळाडू मात्र इकोनॉमी क्लासमध्ये होते. तसेच भारतीय व्हॉलिबॉलल संघाने जकार्ता ते सिंगापूर प्रवास SQ 967 या विमानाने केला. मेहनत खेळाडू घेतील आणि सोयी-सुविधा मात्र अधिकारी उपभोगतील .

हा प्रवास मी स्वखर्चाने केला असल्याचे सांगत सचेती यांनी आपला बचाव केला. ” माझेही इकोनॉमी क्लासचे तिकीट होते, परंतु मी स्वतःच्या खिशातले पैसे टाकून बिझनेस क्लासचे तिकीट घेतले,” असे सचेती यांनी सांगितले. केंद्रिय क्रीडा मंत्रालयानेही सचेती यांच्या वर्तनाचा निषेध केला. मात्र, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने सचेती स्वखर्चाने गेल्याचे स्पष्ट केले.