Business credit facility | व्यवसायिकांना व्यवसाय प्रशिक्षणासह मिळणार ‘क्रेडिट’ सुविधा, लॉन्च झाल्या दोन सर्व्हिस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business credit facility | व्यवसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) ने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) च्या प्रवर्तक आणि व्यवस्थापकांसाठी सहा महिन्यांचा व्यवस्थापन अभ्यासक्रम (Business credit facility) सुरू केला आहे. AIMA ने एका निवेदनात म्हटले आहे की, विशिष्ट्य हेतूसाठी व्यवस्थापन कौशल्य कार्यक्रमाचा उद्देश नवीन अर्थव्यवस्थेसह MSME व्यापाऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता वाढवणे आहे.

 

MSME साठी ऑनलाइन कोर्स.
AIMA च्या 11 व्या MSME परिषदेत या अभ्यासक्रमाच्या लॉन्चिंगची घोषणा करण्यात आली. ही परिषद ऑनलाइन होत आहे. एआयएमएचे अध्यक्ष सीके रंगनाथन (ck ranganathan) यांनी परिषदेला संबोधित करत, कोरोना विषाणू महामारीच्या संकटाच्या काळात केंद्र सरकारने एमएसएमई क्षेत्राला दिलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले. ते म्हणाले की एमएसएमई साठी आपत्कालीन क्रेडिट सुविधा (Business credit facility) हमी योजनेने 13.5 लाख कंपन्यांना दिवाळखोरीपासून व 1.5 कोटी नोकर्‍या वाचवल्या आहेत.

 

व्यवसायिकांसाठी क्रेडिट सुविधा.
दरम्यान, ऑनलाइन पेमेंट सोल्यूशन प्रदाता PayU ने छोट्या आणि मोठ्या व्यवसायांसाठी 25 हजार रुपयांची क्रेडिट सुविधा सुरू केली आहे.
PayU शी संबंधित 3.5 लाख व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल. PayU ने तीन उत्पादने लॉन्च केली आहेत.
मार्केटप्लेस अर्ली सेटलमेंट, प्रायॉरिटी सेटलमेंट आणि मर्चंट लेंडिंग.
हे सॉल्‍यूशन कैपिटलपर्यंत प्रवेश देतात. तसेच रोख प्रवाह व्यवस्थापित आणि तरलता वाढवते.
PayU ची सोल्यूशन्स SMB साठी 25,000 रुपयांपासून ते कोटी रुपयांपर्यंतची क्रेडिट रक्कम ऑफर करतात. त्यांची परतफेड 1 आठवड्यापासून 1 वर्षात केली जाऊ शकते (Business credit facility)

जागतिक बँकेचा अंदाज.
जागतिक बँकेचा अंदाज आहे की भारतीय एसएमबींना $380 अब्ज क्रेडिट गॅपचा सामना करावा लागतो.
यामुळे त्यांना अल्पकालीन खर्च भागवणे आणि दैनंदिन कामे सांभाळणे कठीण होते आहे.
PayU चे नवीन वैशिष्ट्य व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या वेळेपासून 30 मिनिटापेक्षा कमी वेळेत निधी मिळवण्याची परवानगी देते.
हे ट्रॅव्हल आणि कॅब एग्रीगेटर, वित्तीय सेवा यासारख्या व्यवसायांना मदत करते.

 

Web Title :- Business credit facility | loan msme news payu launches solutions helps smbs access credit starting from rupee 25000

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा