• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, May 27, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    राजकीय

    Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला विचारायला जाऊ?…

    ताज्या बातम्या

    Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत पालिकेच्या मिळकत कर विभागाचे 751…

    ताज्या बातम्या

    Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिले…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 1 जुलैपासून बदलणार गॅस सिलेंडर, ATM, PF, सेव्हींग अकाऊंटसह इतर गोष्टींशी संबंधित ‘हे’ 10 नियम, जाणून घ्या

1 जुलैपासून बदलणार गॅस सिलेंडर, ATM, PF, सेव्हींग अकाऊंटसह इतर गोष्टींशी संबंधित ‘हे’ 10 नियम, जाणून घ्या

ताज्या बातम्याराष्ट्रीय
On Jun 30, 2020
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 जुलै 2020 पासून भारतात बरेच मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट तुमच्या जीवनावर होणार आहे. एककीकडे तुम्हाला या नवीन नियमांपासून फायदा मिळेल तर दुसरीकडे जर तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकते. यामध्ये एलपीजी सिलिंडर, अटल पेन्शन योजना, एमएसएमईची ऑनलाईन नोंदणी, PF मधून पैसे काढण्याचे नियम, किसान सन्मान निधीमध्ये नोंदणी, बचत खात्यांवरील पीएनबी व्याज दर, ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्क इत्यादींचा समावेश आहे. जाणून घ्या 1 जुलैपासून कोणते आर्थिक व्यवहार बदलणार आहेत.

1. MSME ऑनलाइन नोंदणी
मायक्रो, लघु आणि मध्यम उपक्रम (एमएसएमई) 1 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. या संदर्भात सरकारने म्हटले होते की, ही नोंदणी स्वयंघोषित माहितीच्या आधारे असेल, त्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज भासणार नाही.

या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, उद्योगांच्या नोंदणीची प्रक्रिया मिळकत कर आणि जीएसटी यांच्याशी जोडली जात आहे. याठिकाणी देण्यात येणाऱ्या माहितीची सत्यता पॅन नंबर आणी जीएसटीआयएनच्या तपशिलावरून पडताळून पाहिली जाईल. उद्योजकांना केवळ आधार क्रमांकाद्वारे नोंदणीची सुविधा दिली जाईल आणि सर्व माहिती स्वयंघोषीत असेल. यासाठी कागदपत्रांची गरज पडणार नाही. मंत्रालयाने ठरविल्या नुसार नोंदणी एमएसएमईच्या नवी परिभाषावर आधारित असेल.

2. कोरोना काळात PF चे पैसे काढण्याची शेवटची तारीख
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने पीएफमधून पैसे काढण्यासाठी अनेक नियम शिथिल केले आहेत. जर तुम्ही पीएफ खात्यातून काही पैसे काढू इच्छित असल्यास 1 जुलै पासून होत आहे हा महत्त्वाचा बदल.
लोकांकडे रोखीची कमतरता लक्षात घेता वित्त मंत्रालयाने ईपीएफकडून आपत्कालीन पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करू दिली होती. 30 जून रोजी अर्ज करण्यासाठीचा शेवटचा दिवस होता. कोणत्या खात्यातून भागधारक मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 3 पट पेक्षा कमी किंवा एकूण ठेव रक्कमेच्या 75 टक्के रक्कम काढू शकतात.

3. ATM विड्रॉलसाठी शुल्क
लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने एटीएममधून पैसे काढताना आकराण्यात येणाऱ्या शुल्कावर सूट दिली होती. तीन महिन्यासाठी कोणत्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली होती. यासाठी 30 जून 2020 ही डेडलाईन आहे. त्यामुळे 1 जुलैपासून ठराविक ट्रान्झाक्शननंतर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे. साधारणपणे कोणतीही बँक एका महिन्यात 5 वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी देते. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून 3 वेळा विनाशूल्क रक्कम काढता येते. या मर्यादेनंतर बँका अतिरिक्त 8 ते 20 रुपयांचे शुल्क आकारतात. मेट्रो सटीमध्ये प्रत्येक महिन्याला 8 आणि मेट्रो सीटी नसलेल्या शहरामध्ये 10 पेक्षा जास्त वेळा पैसे कढाल्यावर फी भरावी लागेल.

4. खात्यात किमान शिल्लक आवश्यक
1 जुलैपासून तुमच्या खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक रक्कम नसल्यास बँकेकडून दंड आकारला जाऊ शकतो. एप्रिल ते जून दरम्यान याकरता सूट देण्यात आली होती. सध्या मेट्रो सीटी, शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागानुसार वेगवेगळ्या बँकांमध्ये बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा वेळी आहे. ही सूट वाढवण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

5. बचत खात्यांवरील पीएनबी व्याज दर
पंजाब नॅशनल बँक 1 जुलैपासून आपल्या बचत खातेधारकांना कमी व्याज देणार आहे. बचत खात्याच्या व्यजदरामध्ये 0.50 टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. 1 जुलैपासून हा नियम लागू होणार आहे. यानंतर बँकेच्या बचत खात्यावर जास्तीत जास्त 3.25 टक्के वार्षीक व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यात 50 लाख रुपयापर्यंत जमा रकमेवर 3 टक्के वार्षीक आणि 50 लाखापेक्षा अधिक रकमेवर 3.25 टक्के वार्षीक व्याज देण्यात येणार आहे.

6. एलपीजी सिलिंडरच्या किंमती बदलणार
1 जुलैपासून देशात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीही बदलणार आहेत. देशातील तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हा बदल करतात. त्याची किंमत सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्ख आणि विदेशी विनिमय दरामधील बदलांसारखे घटक निर्धारित करत असतात. प्रत्येक राज्यामध्ये टॅक्स वेग-वेगळा असतो आणि त्याच्या हिशोबाने एलपीजीच्या किंमतीमध्ये फरक असतो. सध्या सरकार एका वर्षामध्ये प्रत्येक घरासाठी 14.2 किलोग्रामच्या 12 सिलिंडर्सवर अनुदान देते. ग्राहकांना यापेक्षा जास्त सिलिंडर घ्यायचे असतील तर ते बाजारभावाने खरेदी करावे लागतील.

7. अटल पेन्शन योजनेत मोठा बदल
जर आपण अटल पेन्शन खातेदार असाल तर अटल पेन्शन योजनेत सरकारने 1 जुलैपासून कोणते बदल केले आहेत, हे आपल्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 1 जुलैपासून अटल निवृत्तीवेतन योजना खात्यांमधून मासिक योगदानाचे ऑटो डेबिट होण्यास सुरुवात होईल. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकारणाने बँकांना अटल पेन्शन योजनेचे ऑटो डेबिट 30 जूनपर्यंत थांबवण्याचे निर्देश दिले होते. त्या आधारे आता 1 जुलैपासासून पुन्हा एकदा ऑटो डेबिट सुविधा सुरू केली जाईल.

या योजनेतील बहुतेक ग्राहक समाजातील खालच्या स्तरातील आहेत आमि कोरोनामधील लॉकडाऊनमुळे या लोकांना संकटाचा अधिक सामना करावा लागत आहे. पीएफआरडीएच्या अलीकडील अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, जर ग्राहकांच्या पेन्शन योजनेचे खाते 30 सप्टेंबर 2020 पूर्वी नियमित केले गेले असेल तर दंड व्याज आकारला जाणार नाही. 501 ते 1000 रुपयांमधील योगदानावर प्रति महिना पाच रुपये दंड आहे. आणि 1000 रुपये ओलांडल्यास दरमहा 10 रुपये दंड आकारला जाईल.

9. विश्वास योजनेचा लाभ मिळणार नाही
सेवा कर आणि मध्यवर्ती उत्पादन शुल्क या संदर्भात जुन्या प्रलंबित वादग्रस्त खटल्यांच्या निराकरणासाठी सादर केलेली विश्वास योजनेच्या देयकाची अंतिम तारीख 30 जून आहे. आपण या योजनेचा लाभ 1 जुलैपासून घेऊ शकणार नाही. सबका विश्वास योजना कर विवादाच्या प्रत्येक समस्येवर तोडगा आहे. 30 जून नंतर या योजनेची मुदत वाढवण्यात येणार नाही हे सरकारने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डाच्या वतीने ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 90 कोटी रुपयांचे 1.9 लाख डिक्लेरेशन फाईल दाखल करण्यात आल्या आहेत. 30 जून 2020 पर्यंत पैसे न भरल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.

10. किसान सन्मान निधी मध्ये नोंदणी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकार दरवर्षी 2000 रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत 5 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. या योजनेची नोंदणी 30 जूनपर्यंत होऊ शकते. जर 30 जूनपर्यंत नोंदणी केली असले आणि ज्याच अर्ज स्विकारण्यात आला असेल त्याला जुलै मध्ये 2000 रुपये आणि ऑगस्टमध्ये दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात 2000 रुपये मिळू शकतील.

Atal Pension SchemeATMATM withdrawalATM विड्रॉलbreaking newscentral governmentCoronaCorona virus
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Gold Sliver Rates : चांदीच्या किंमतीत 1400 रूपयांपेक्षा जास्तीने वाढ, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

Next Post

आषाढी एकादशी : विठ्ठल-रूक्मिणीला फळाफुलांची आरास




मनोरंजन

मनोरंजन

Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Deepika Padukone Viral News | वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Disha Patani Baby Bump | दिशा पतानीच्या पोटाची अवस्था पाहून…

Shaikh Sikandar May 27, 2022
मनोरंजन

Ranbazar | ‘रानबाजार’ने भागावली अभिनेत्री माधुरी…

Shaikh Sikandar May 24, 2022
ताज्या बातम्या

Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या…

nagesh123 May 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

मुंबई

PM Crop Insurance Scheme | खूशखबर ! महाराष्ट्रातील जवळपास…

राष्ट्रीय

7th Pay Commission | जुलैपासून वाढू शकते केंद्र सरकारच्या…

महत्वाच्या बातम्या

Unique Land Parcel Identification Number Project | आता एका…

ताज्या बातम्या

Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’…

Latest Updates..

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता…

May 27, 2022

Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत…

May 27, 2022

Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात…

May 27, 2022

Pune Crime | आंदेकर टोळीतील फरार आरोपी आणि पोलिसात नाना…

May 27, 2022

Disha Patani Baby Bump | दिशा पतानीच्या पोटाची अवस्था पाहून…

May 27, 2022

Pune Crime | अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध, तरुणासह…

May 27, 2022

High Blood Pressure Causes | तुमचा BP नेहमी हाय असतो का ?…

May 27, 2022

Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर…

May 27, 2022

Shehnaaz Gill Skin Care | शहनाज गिलच्या…

May 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राजकीय

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला विचारायला…

Nitin Patil May 27, 2022

This Week

Pune Kidney Transplant Case | किडनी प्रत्यारोपणाच्या प्रकरणाला नवे…

May 26, 2022

Menstruation Period | महिलांच मासिक पाळी चक्र बिघडण्याचं नक्की कारण…

May 27, 2022

Ajit Pawar | उद्घाटनाला पोहोचताच अजित पवारांनी केली अधिकाऱ्यांची…

May 27, 2022

Belly Fat | पोटातील चरबीमुळे तुम्हीही त्रस्त आहात का, मग सकाळी…

May 27, 2022

Most Read..

क्राईम स्टोरी

Pune Crime | पुण्यात विनापरवाना बनावट सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, 7.73…

May 27, 2022
महत्वाच्या बातम्या

Unique Land Parcel Identification Number Project | आता एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार; जाणून घ्या

May 27, 2022
मनोरंजन

Raveena Tondon Glamorous Look | रवीना टंडनने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वाढवला सोशल मीडियाचा पारा… फोटो पाहून…

May 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.