केवळ 8 वर्षाच्या ‘या’ मुलानं कमावले 182 कोटी ! ‘या’ गोष्टींमध्ये बनला जगात नं. 1

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आणि इंटरनेटचा आहे. इंटरनेटच्या माध्यमातूनच केवळ 8 वर्षाच्या रेयानने आपल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून 2019 मध्ये 26 मिलियन डॉलर म्हणजेच 182 कोटी रुपये कमावले आहेत. एका मॅगजीनने दिलेल्या यादीनुसार रेयानचे नाव ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तीमध्ये जोडण्यात आले आहे.

रियानच्या प्रत्येक व्हिडिओला कमीतकमी 100 कोटी व्हीव्हज आहेत. या चॅनलला सुरुवातीला रेयान टॉयज रीव्यूच्या नावाने ओळखले जात होते. रियान लहान मुलांच्या खेळाच्या अनबॉक्सिंगचे व्हिडिओ बनवतो आणि त्याचे पालक तो व्हिडीओ यु ट्यूबवर टाकतात.

कोणाची नावे आहेत यादीमध्ये
रेयान काजी याच्या चॅनलने डूड परफेक्ट चॅनलला मागे टकले आहे. यादीतील दुसर्‍या क्रमांकावर डूड परफेक्ट आहे. त्याने एका वर्षात 20 लाख डॉलर्स म्हणजेच 140 कोटी रुपये कमावले आहेत. यानंतर तिसर्‍या क्रमांकावर रुसच्या 5 वर्षीय अनासतासियाचा चॅनल आहे. एका वर्षात या चॅनलने 126 कोटींची कमाई केली आहे. अनास्तासियाच्या ‘लाइक नास्तिया व्लॉग’ आणि ‘फनी स्टॅसी’ चे 70 लाख ग्राहक आहेत.

कोण आहे रेयान काजी
रेयान काजीचे खरे नाव रेयान गौन आहे. 2018 मध्ये आलेल्या यादीत देखील रियान अव्वल स्थानी होता. गेल्या वर्षी त्याने 22 मिलियन डॉलर कमावले होते. 2015 मध्ये ‘रेयान्स वर्ल्ड’ नावाचे चॅनल सुरु करण्यात आले होते. त्यावेळी त्याचे वय केवळ तीन वर्षांचे होते. केवळ पाच वर्षात 22.9 मिलियन सब्सक्राइबर झाले आहेत. रियान लहान मुलांच्या खेळण्याला अनबॉक्सिंग करताना आणि खेळ खेळताना एक छोटासा व्हिडीओ बनवतो आणि यावरूनच त्याची कमाई होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/