Business Idea | ‘या’ बिझनेसमध्ये आहे गुंतवणुकीपेक्षा अनेक पट मोठा नफा, केवळ 5 वर्षात बनू शकता करोडपती; जाणून घ्या कशी करावी सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | सामान्यपणे तुम्ही रस्त्याच्या कडेला उंच-उंच हिरवी झाडे पाहिली असतील. बहुतांश ही झाडे नीलगिरीची असतात. लोक ती निरूपयोगी समजतात, परंतु ही झाडे खुप उपयोगी आहेत. त्यांच्या शेतीतून लाखो रूपयांचा नफा कमावता येतो. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे पिक घेण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. सोबतच खर्चदेखील खुप कमी येतो. याच्यासाठी कोणत्याही खास हवा, पाण्याची गरज नसते. ती कुठेही वाढवता येतात. (Business Idea)

 

हे झाड सरळरेषेत उंच वाढते. यामुळे जास्त जागेची गरज लागत नाही. जाणकारांचे म्हणणे आहे की, एक हेक्टरमध्ये नीलगिरीची 3000 झाडे लावता येऊ शकतात. त्यांचे रोप 7 ते 8 रूपयांना सहज मिळते.

 

हे ऑस्ट्रेलियन वंशाचे झाड आहे. परंतु भारतात सुद्धा याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. याच्या इतर नावांच्या बाबत बोलायचे तर, त्यास गम, सफेदा इत्यादी नावे आहेत. या झाडांचा वापर हार्डबोर्ड, लगदा, फर्नीचर, पेट्या इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. भारतात मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, आंध्र प्रदेश, पंजाब सारख्या अनेक राज्यांत याची शेती केली जाते. सामान्यपणे एका झाडाची उंची 40 ते 80 मीटरपर्यंत होऊ शकते. या दोन झाडांमध्ये दिड मीटर अंतर ठेवावे. (Business Idea)

 

नीलगिरीची रोपे 5 वर्षात चांगली वाढ करतात. यानंतर ती कापली जातात. एका झाडातून सुमारे 400 किलो लाकूड मिळते.
बाजारात यूकेलिप्टसचे लाकूड 6 – 7 रूपये प्रति किलोने विकले जाते.
जर आपण एक हेक्टरमध्ये तीन हजार झाडे लावली तर सहजपणे 72 लाख रूपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

 

Web Title :- Business Idea | business idea start neelgiri eucalyptus safeda farming with low investment earn good income know how to start

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा