Business Idea | मोदी सरकार देत आहे बंपर कमाई करण्याची संधी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | जर तुम्ही एखाद्या बिझनेसच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एका चांगल्या बिझनेस बाबत सांगणार आहोत. केंद्र सरकार (Modi Government) तुम्हाला मोठी कमाई करण्याची संधी देत आहे. तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात तुमचे भविष्य घडवू शकता. अशीही कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्राची मागणी वाढली आहे (Business Idea). केंद्र सरकार जेनरिक औषधे पुरवण्यासाठी प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र (Jan Aushadhi Kendras) उघडण्याची संधी देत आहे. यासाठी सरकार मदत सुद्धा करत आहे.

 

सरकार जन औषधी केंद्रांची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. सरकार देशात मार्च 2024 पर्यंत देशभरातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत वाढवण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. अशावेळी, तुम्हाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत बनवण्याची संधी आहे.

 

केंद्र उघडण्यासाठी काय आहे पात्रता
जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी सरकारने तीन प्रकारची पात्रता निश्चित केली आहे. पूर्वी कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी हे केंद्र उघडू शकत होते. दुसर्‍या प्रकारात स्वयंसेवी संस्था, खासगी रुग्णालये, ट्रस्ट इत्यादी येतात, तर तिसर्‍या श्रेणीत सरकारने ठरवलेल्या संस्थांना संधी दिली जाते. (Business Idea)

 

हे केंद्र उघडण्यासाठी, तुमच्याकडे बी.फार्मा, किंवा डी.फार्माची पदवी असणे आवश्यक आहे,
जी अर्जाच्या वेळी सादर करावी लागेल. एससी-एसटी आणि दिव्यांग अर्जदारांना 50,000 रुपयांची औषधे आगाऊ दिली जातात.

कुठे अर्ज करायचा
जन औषधी केंद्र उघडण्यासाठी किरकोळ औषध परवाना आवश्यक आहे, ज्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट janaushadhi.gov.in वरून फॉर्म डाउनलोड करावा लागेल. हा फॉर्म भरा आणि ब्युरो ऑफ फार्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजरच्या नावाने पाठवा.

 

नफा किती होईल
जनऔषधी केंद्राद्वारे विकल्या जाणार्‍या सर्व औषधांवर 20 टक्के कमिशन उपलब्ध आहे.
याशिवाय, दर महिन्याला विकल्या जाणार्‍या एकूण औषधांवर 15% प्रोत्साहन देखील दिले जाते.
केंद्र सुरू करण्यासाठीही सरकार फर्निचर इत्यादींसाठी दीड लाख रुपयांची मदत करते.
बिलिंगसाठी संगणक, प्रिंटर इत्यादी खरेदी करण्यासाठी सरकार 50 हजार रुपयांपर्यंत मदत करते.

 

Web Title :- Business Idea | business idea start open pradhanmantri janaushadhi kendra with the help of central government earn good income

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…