
Business Idea | एक लाखमध्ये सुरू होईल ‘हा’ बिझनेस आणि केवळ 2 महिन्यात खर्च काढून देईल नफा, जाणून घ्या जबरदस्त आयडिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | हा व्यवसाय केवळ एक लाखात सुरू होईल आणि खर्च काढून फक्त २ महिन्यांत नफा देईल. ही बिझनेस आयडिया (Business Idea) जाणून घेवूया. तुम्ही बटाटा चिप्सचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला या व्यवसायाची माहिती देत आहोत (Batata Chips Business).
हा व्यवसाय पॅकेज्ड फूडचा असल्याने, सर्वप्रथम तुम्हाला FSSAI कडून परवाना घ्यावा लागेल.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला चिप्स बनवण्याचे मशीन घ्यावे लागेल. याच्या मदतीने तुम्ही दररोज मोठ्या प्रमाणात चिप्स बनवू शकाल. व्यवसायाच्या सुरूवातीस, तुम्ही लहान मशीनने काम करू शकता. नंतर, व्यवसायाच्या वाढीनंतर एक मोठे मशीन खरेदी करू शकता.
साधारणपणे, बटाटा चिप्स व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च कमी असतो. बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाटे, मसाले आणि तेल लागते.
मशिनसह या सर्व गोष्टींच्या खर्चाचा समावेश केला तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त एक लाख रुपये खर्च येतो.
यानंतर, जर तुमचा व्यवसाय चांगला चालला तर तुम्ही दरमहा ४० ते ५० हजार रुपये सहज कमवू शकता.
Web Title :- Business Idea | business idea start potato chips business to get good return by this business
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर