Business Idea | हा बिझनेस सुरू केल्यानंतर ताबडतोब सुरू होईल कमाई, वर्षभर डिमांड! येथे जाणून घ्या डिटेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | बहुतेक लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करणे ही एक मोठी जोखीम मानतात आणि नोकरी करत राहतात. यामागे एक प्रमुख कारण म्हणजे व्यवसायात यश न मिळण्याची भीती असते. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यात धोका असला तरी त्याशिवाय जास्त पैसे मिळवणे शक्य नाही. जर तुम्हीही असा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि त्याची मागणी कधीही कमी होऊ नये असे वाटत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक उपयुक्त बिझनेस आयडिया (Business Idea) घेऊन आलो आहोत.

 

वर्षभर मागणी असलेला हा व्यवसाय म्हणजे ब्रेड मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करण्याचा खर्च फारसा नसतो आणि लगेच कमाई सुरू होते. ब्रेडचा वापर आजकाल मोठ्या शहरांपासून छोट्या गावांमध्ये राहणारे सर्व लोक करतात. यामुळे तुमच्या व्यवसायात मंदी कधीच येणार नाही.

 

कसा सुरू करायचा हा व्यवसाय?
ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारण्यासाठी तुम्हाला कारखाना उभारण्यासाठी जागा, ब्रेड बनवण्याची मशीन, पॉवर बॅकअप, पाण्याची सुविधा, मजूर लागतील. याशिवाय, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला बाजारपेठेत स्थान मिळवण्यासाठी बिझनेस प्लान बनवावा लागेल. जर तुम्ही ते छोट्या प्रमाणात हा बिझनेस सुरू केला तर त्यात किमान ५ लाख रुपये गुंतवावे लागतील. (Business Idea)

एफएसएसएआयकडून घ्या लायसन्स
ब्रेड बनवण्याचे काम खाण्यापिण्याशी संबंधित आहे, त्यामुळे ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग सुरू करण्यापूर्वी तुम्हाला त्याची नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला हा व्यवसाय चालवण्यासाठी एफएसएसएआयकडून लायसन्स देखील घ्यावे लागेल. लायसन्स मिळाल्यानंतर तुम्ही ब्रेड बाजारात विकू शकता.

 

या बिझनेसमध्ये किती होईल कमाई?
ब्रेडच्या सध्याच्या किमतीनुसार एक पॅकेट ४० रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत बाजारात विकले जाते.
दुसरीकडे, तो बनवण्यासाठी येणारा खर्च खूपच कमी आहे.
जसजसा तुम्ही बिझनेस वाढवाल, तसतसा प्रति पॅकेट खर्च आणखी कमी होईल.
सध्या बाजारात याला भरपूर मागणी असून मागणी सातत्याने वाढत आहे.
अशावेळी तुम्ही या बिझनेसमधून दरमहा लाखो रुपये कमवू शकता.

 

Web Title :- Business Idea | how to start bread manufacturing business money making tips and tricks new business idea

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

Ajit Pawar | ‘मी बिलंदर शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही, पण…’ अजित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला

MLA Sunil Tingre | नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन वाहतुक कोंडी सोडवा; आमदार सुनिल टिंगरे यांची लक्षवेधीतून विधानसभेत मागणी