Business Idea | महिलांसाठी कमाईचा बेस्ट ऑपशन, कमी खर्चात घरातून सुरू करा हा बिझनेस!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरबसल्या चांगली कमाई असलेला व्यवसाय (Business Idea) सुरू करायचा असेल आणि कोणता व्यवसाय करायचा हे समजत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. ज्या महिलांना काही काम करायचे आहे पण त्यांना बाहेर जाऊन काम करणे शक्य नसेल त्यांच्यासाठी हा उत्तम बिझनेस ऑपशन आहे. हा बिझनेस केचप आणि सॉस बनवण्याचा (Business Of Making Tomato Ketchup And Sauce) आहे. टोमॅटो केचप किंवा सॉस हे बाजारात जास्त मागणी असलेले एक लोकप्रिय उत्पादन बनले आहे. प्रत्येक स्वयंपाकघर, रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूड स्टॉलवर ते दिसते. अशावेळी टोमॅटो सॉस बनवण्याचे युनिट सुरू केले तर ते खूप फायदेशीर ठरू शकते. (Business Idea)

 

कसा सुरू करायचा केचप बनवण्याचा व्यवसाय?
केचप बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान २ लाख रुपये गुंतवावे लागतील. यासाठी कॅटल, ग्रायंडर मिक्सी, बॉयलर आणि कमर्शियल स्टोव्ह लागेल. हे युनिट १०० यार्डच्या जागेत स्थापन करू शकता. केचप बनवण्याचे युनिट चालविण्यासाठी ९ ते १० लोकांची आवश्यकता आहे. युनिटमध्ये फक्त ५ लोक केचप बनवू शकतात, परंतु उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी आणखी ४-५ लोक ठेवावे लागतील. हा व्यवसाय खाण्यापिण्याशी संबंधित असल्याने त्यासाठी लायसन्स घेणे आवश्यक आहे.

लायसन्ससाठी करू शकता ऑनलाइन अर्ज
टोमॅटो केचपचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन्स असणे आवश्यक आहे. हा व्यवसाय लायसन्सशिवाय चालवू शकत नाही. हे लायसन्स fssai द्वारे जारी केले जातो. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. अर्ज केल्यानंतर १०-१५ दिवसात ते मिळेल. लायसन्स मिळाल्यानंतर उत्पादन बाजारात विकू शकता. (Business Idea)

 

अशी मिळेल सरकारी मदत
केचपचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार मदत करते.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ५० हजार ते १० लाखांपर्यंतचे कर्ज कमी दरात मिळू शकते.
कर्ज घेण्यापूर्वी लायसन्स दाखवावे लागेल.

 

Web Title :- Business Idea | how to start tomato ketchup manufacturing business can earn thousands by this idea

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shamna Kasim | आलिया भट्टनंतर आता ‘या’ अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तीन महिन्यातच दिली गुड न्यूज

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल