Business Idea | जगभरात ‘या’ प्रॉडक्टची आहे सर्वात जास्त धूम, लवकर बनू शकता करोडपती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Business Idea | जर तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय (Starting own business) सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पेपर नॅपकिन्स (paper napkins) च्या व्यवसायात नशीब आजमावू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारही मदत करत आहे. पेपर नॅपकिन्स बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट (Manufacturing unit) बसवून तुम्ही बंपर कमाई (Earn money) करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो आणि तुम्ही किती कमाई करू शकता, ते जाणून घेवूयात. (Business Idea)

 

आजच्या बदलत्या जीवनशैलीत टिश्यू पेपर म्हणजेच पेपर नॅपकिन्सचा वापर अधिक होऊ लागला आहे. सहसा हात आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर केला जातो. आजकाल तो रेस्टॉरंट, हॉटेल, ढाबा, ऑफिस, हॉस्पिटल अशा जवळपास सर्वत्र ठिकाणी वापरला जातो.

 

किती करावी लागते गुंतवणूक

जर तुम्हाला पेपर नॅपकिन्स म्हणजेच टिश्यू पेपरचे उत्पादन युनिट उभारायचे असेल तर तुम्हाला सुमारे 3.50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. इतके पैसे मिळाल्यानंतर तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्जासाठी कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. (Business Idea)

तुमच्याकडे 3.50 लाख रुपये असल्यामुळे, तुम्हाला बँकेकडून सुमारे 3.10 लाख रुपये टर्म लोन आणि 5.30 लाख रुपयांपर्यंतचे वर्किंग कॅपिटल लोन मिळेल. एका वर्षात 1.50 लाख किलो पेपर नॅपकिन्स तयार होऊ शकतात. सुमारे 65 रुपये किलो दराने त्याची विक्री करू शकता. म्हणजेच तुम्ही एका वर्षात सुमारे 97.50 लाख रुपयांची उलाढाल करू शकता. यातील सर्व खर्च वजा केल्यास वर्षाला सुमारे 10-12 लाख रुपयांची बचत होऊ शकते.

 

मुद्रा योजनेअंतर्गत अर्ज करा

यासाठी तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता.
यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये नाव, पत्ता, व्यवसाय पत्ता, शिक्षण, चालू उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे,
इत्यादी तपशील द्यावे लागतील. यामध्ये कोणतीही प्रोसेसिंग फी किंवा गॅरंटी फी भरावी लागत नाही.
कर्जाची रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते.

 

Web Title :- Business Idea | start tissue napkin paper manufacturing unit with help mudra loan scheme know full details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा