Business Idea | OLA सोबत मिळून घरबसल्या कमावू शकता चांगले पैसे, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | आज आम्ही तुम्हाला अशीच एक बिझनेस आयडिया सांगणार आहोत, जी तुम्ही घरी बसूनही करू शकता. या व्यवसायात तुम्ही छोटी गुंतवणूक करून दर महिन्याला चांगले पैसे कमवू शकता. तुम्हाला ट्रॅव्हल क्षेत्रात स्वारस्य असल्यास, तुमच्यासाठी ही आणखी चांगली संधी आहे. तुम्ही सेकंड हँड कार खरेदी करून आणि ती भाड्याने देऊन मोठी कमाई करू शकता. तुम्ही हा छोटा व्यवसाय ओला (OLA) सोबत सुरू करू शकता, ही कंपनी अ‍ॅप-आधारित कॅब प्रदान करते. या व्यवसायाद्वारे तुम्ही दरमहा किमान 50 हजार रुपये सहज कमवू शकता. (Business Idea)

 

वास्तविक, ओला आपल्या प्लॅटफॉर्मवर फ्लीट अटॅच करणे म्हणजेच एकाच वेळी अनेक कार जोडण्याची सुविधा देत आहे. यावर तुम्ही 2-3 गाड्यांव्यतिरिक्त अनेक गाड्या जोडून व्यवसाय करू शकता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार गाड्यांची संख्या वाढवू शकता, यासाठी कोणतीही मर्यादा नाही. अशावेळी, तुमच्याकडे जितक्या जास्त कार असतील, तितकी तुमची कमाई होईल. (Business Idea)

 

या कागदपत्रांची आवश्यकता असेल

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल. यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, रद्द केलेला चेक, आधार कार्ड, घराचा पत्ता लागेल. याशिवाय, कारची कागदपत्रे, जसे की वाहन आरसी, वाहन परमिट, कार विमा, या सर्वांची आवश्यकता असते. त्याचबरोबर चालकाच्या कागदपत्रांमध्ये डीएल, आधार कार्ड (Aadhaar Card), घराचा पत्ता असणे आवश्यक आहे.

ओला स्मॉल बिझनेस सुरू करणार्‍यांसाठी सुलभ प्रक्रिया प्रदान करत आहे. आता तुम्ही एकाच अ‍ॅप्लिकेशनवरून तुमच्या प्रत्येक टॅक्सीचा पगार आणि परफॉर्मन्स तपासू शकता. ओलाने आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली आहे. यासाठी तुम्हाला https://partners.olacabs.com/attach bm ला भेट द्यावी लागेल.

 

प्रत्येक कारमधून कमावू शकता 40 ते 50 हजार नफा

यासाठी तुम्हाला ओलाच्या ड्रायव्हर पार्टनर्स प्रोग्राममध्ये सहभागी व्हावे लागेल. ओला हा कार्यक्रम बर्‍याच काळापासून चालवत आहे. या कार्यक्रमांतर्गत, तुमच्या एका कारमधून सर्व खर्च वजा करूनही, तुम्ही दरमहा 40,000 ते 45,000 रुपये कमवू शकता. तुमच्याकडे असलेल्या कारच्या संख्येनुसार एकूण रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल. मात्र यातून तुम्हाला चालकाचा पगार द्यावा लागेल.

 

ओलामध्ये कसे सामील व्हावे ?

ओलाच्या ड्रायव्हर पार्टनर्स प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या ऑफिसला भेट द्यावी लागेल.
त्यांच्या जवळच्या ऑफिसची माहिती घेऊन तुम्ही तिथे पोहोचू शकता.
येथे तुम्हाला तुमचे व्यावसायिक दस्तऐवज सबमिट करावे लागतील. कागदपत्र पडताळणीनंतर तुमची नोंदणी सुरू होईल.
ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 8 ते 10 दिवस लागू शकतात. यानंतर तुमची फ्लीट ओलासोबत धावू लागेल.

 

कंपनीकडून बोनसही मिळेल

दिवसभरात जेव्हा वाहनांना जास्त मागणी असते, त्या वेळी बुकिंग केल्यास त्यावर 200 रुपयांपर्यंतचा बोनस मिळतो.
जर एका दिवसात 12 राईड पूर्ण झाल्या तर कंपनीकडून निश्चित बोनस अंतर्गत तुम्हाला 800 ते 850 रुपये अतिरिक्त मिळतील.
बोनसमध्ये मिळणारी रक्कमही वेळोवेळी बदलत असते.

 

Web Title : –  Business Idea | you can earn big amount by starting a business with ola

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा