EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत
नवी दिल्ली : वृत्त संस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO ) आपल्या सदस्यांना सात लाख रुपयांपर्यंत जीवन विमाची सुविधा देत आहे हे तुम्हाला माहित आहे का? होय, हे खरे आहे. जर तुमचे सुद्धा पीएफ अकाऊंट आहे आणि लागोपाठ 12 महिने जॉब केला असेल तर तुमचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबियांना या विमा रक्कमेचा लाभ मिळू शकतो. येथे आवश्यकता ही आहे की, यासंबंधी जास्तीत जास्त लोकांना जागरुक केले गेले पाहिजे. जेणेकरून क्लेम सादर करून विमा रक्कम प्राप्त करता येऊ शकते. अलिकडेच ईपीएफओने ईडीएलआय (इम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम) च्या अंतर्गत विमा कव्हर वाढवून सात लाख रुपये केले आहे.
कोरोनाने मृत्यू झाला तरी मिळेल कव्हर
जर एखाद्या ईपीएफओ मेंबर्सचा कोरोना संकटात मृत्यू झाला तर नॉमिनी लाईफ इन्श्युरन्सच्या रक्कमेवर क्लेम करू शकतो. यापूर्वी याचे लिमिट 6 लाख रुपये होते. मागच्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये याचे लिमिट वाढवून 7 लाख रुपये करण्यात आले.
द्यावा लागत नाही प्रीमियम
सध्या ईपीएफमध्ये कर्मचार्याच्या बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम जमा होते. एम्प्लॉयर सुद्धा 12 टक्के जमा करतो परंतु ती दोन भागात जमा होते. कंपनी 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये आणि 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा करते.
अशी होते क्लेमची गणना
ईडीएलआय स्कीममध्ये क्लेमच्या गणनेचा फॉर्म्युला (कर्मचार्याला मिळालेल्या अखेरच्या 12 महिन्यांच्या बेसिक सॅलरीच्या सरासरीच्या 35 पट)+(शेवटच्या 12 महिन्यांदरम्यान सरासरी पीएफ बॅलन्सच्या 50 टक्के, जे 1,75,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल) आहे. जर कर्मचार्याने लागोपाठ 12 महिने काम केले आहे, तर किमान लाभ 2,50,000 पेक्षा कमी नसेल.
Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तसांत ‘कोरोना’चे 458 नवीन रुग्ण, 314 जणांना डिस्चार्ज
Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 31,964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93.46 %
असा होईल क्लेम
या रक्कमेसाठी क्लेम नॉमिनीकडून पीएफ खातेधारकाचा आजाराने, दुर्घटनेत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर केला जाऊ शकतो. यामध्ये एकरक्कमी पैसे दिले जातात. हा इन्श्युरन्स कव्हर सबस्क्रायबरला फ्री मिळतो. यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यावी लागत नाहीत. पीएफ अकाऊंटसोबत ते लिंक होते. यासाठी इन्श्युरन्स कंपनीला डेथ सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट आणि बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता असते. कोविड-19ने होणार्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा हा घेता येऊ शकतो. जर कुणाचा कुणी नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारस क्लेम करू शकतो.
‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा !’
Nana Patole : ‘मोदी सरकारच्या कारभाराने देश 15 वर्षे अधोगतीकडे गेला’
Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’
Pune : नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणार्याला गुजरातच्या जेलमधून घेतलं ताब्यात, सायबर पोलिसांकडून अटक