LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एलआयसी कार्ड्स सर्व्हिसेस लिमिटेड (LIC CSL) ने रुपे प्लॅटफॉर्म (Rupay) वर आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) सहकार्याने एक कॉन्टॅक्टलेस प्रीपेड गिफ्ट कार्ड ’शगुन’ लाँच केले आहे.
एलआयसी सीएसएल (LIC CSL) ने एका वक्तव्यात म्हटले आहे की, या कार्डचा उद्देश गिफ्ट देण्याच्या कॅशलेस पद्धतीला प्रोत्साहन देणे आहे.
एलआयसी सीएसएल कार्डद्वारे 500 रुपयांपासून 10,000 पर्यंतच्या कोणत्याही रक्कमेची भेट दिली जाऊ शकते.
या कार्डने ग्राहक 3 वर्षाच्या वैधतेच्या आत अनेक व्यवहार करू शकतात.
यामध्ये ग्राहक एकापेक्षा जास्त ट्रान्जक्शन करू शकतात.
याचा वापर ऑनलाइन खरेदीपासून बिल भरण्यासाठी केला जाऊ शकतो.

Web Title : Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

जाणून घ्या कार्ड बाबत…
शगुन कार्ड, सुरूवातीच्या फेजमध्ये अधिकृत वापरासाठी एलआयसी आणि तिच्या सहायक कंपन्यांसाठी उपलब्ध असेल.
कार्डचा वापर अधिकृत संमेलने आणि सोहळ्यांच्या खास पुरस्कारांच्या सुविधेसाठी केला जाईल. नंतर यास एका डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे इतर वापरासाठी सुद्धा वापरात आणले जाईल.

Shagun Gift Card चा वापर भारतात लाखो मर्चंट आउटलेट्स आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर कार्डवर खर्च करण्याच्या पर्यायामध्ये विविधता आणण्यासाठी केला जाऊ शकतो.
कंपनीने आपल्या वक्तव्यात म्हटले की, कार्ड वापरकर्त्यांना डिपार्टमेंटल स्टोअर, पेट्रोल पम्प, रेस्टॉरंट,
ज्वेलरी स्टोअर, कपड्यांचे स्टोअर इत्यादीसह विविध व्यापारी ठिकाणांवर खरेदी करण्याचे स्वतंत्र्य देईल.

ते या कार्डचा वापर करून विविध मोबाइल वॉलेट आणि ई-कॉमर्स पोर्टल किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी, बिलांचा भरणा, विमान, रेल्वे, बस इत्यासाठी तिकिट बुक करण्यासाठी करू शकतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : business lic cards launches rupay prepaid gift card shagun check details varpat

हे हि वाचा

Pune Police | पुणे पोलिसांची जळगावमध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई; भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षासह काहींना घेतले ताब्यात

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्यदलात NCC सर्टिफिकेटधारक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

 

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार