Medwin हेल्थकेअरनं ‘कोरोना’चा प्रसार रोखणारं shycocan डिव्हाइस केलं सादर, 99.9 % ‘प्रभावी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मेडविन हेल्थकेअरने कोरोना विषाणूचा प्रसार रोखणारं डिव्हाइस बनवलं आहे. हे डिव्हाइस 99.9 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्या डिव्हाइसचं नाव shycocan (स्कैलेन) असं आहे.

मेडविन हेल्थकेअरने सांगितले की, या डिव्हाइसची निर्मिती ऑर्गनायजेशन द स्कैलेन सायबरनेटिक्स लिमिटेडचे चेअरमन राजा विजय कुमार यांनी केली आहे. कंपनीने सांगितले की, त्यांच्याकडे भारतासाठी शाइकोकनची निर्मिती आणि विक्रीचं ह्युमनिटेरियन अग्रीमेन्ट आहे.

ते संपूर्ण साऊथ आशियामध्ये हे डिव्हाइस उपलब्ध करून देणार असल्याचं कंपनीने सांगितलं. कुमार यांनी सांगितले, शाइकोकन 99.9 टक्के स्पाइक-प्रोटीन किंवा एस-प्रोटीन ला न्युट्रालाईज करण्यासाठी प्रभावी आहे. हे तेच प्रोटीन आहे जे कोरोना विषाणूमध्ये आढळतं. या डिव्हाइसला यूएस फूड अँड ड्रग अडमिनिस्ट्रेशन आणि युरोपियन युनियन कन्फरमाइट कडून परवानगी मिळाली आहे.

मेडविन हेल्थकेअरचे सीइओ देवाशीस बोस यांनी सांगितले की, मेडविन हेल्थकेअर फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात या डिव्हाइसची निर्मिती आणि विक्री करणार आहे. कंपनी हे डिव्हाइस सुरुवातीला हॉस्पिटल्स,फ्रंटलाईन वोरियर्सना देणार आहे.

या डिव्हाइसची निर्मिती सुरु झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. याचे उत्पादन अधिक वाढवणार आहोत, या महिन्याच्या शेवटी डिव्हाइस तयार होणार आहेत. 1,30,000 डिव्हाइसची निर्मिती करण्याचं आमचं लक्ष्य आहे. या डिव्हाइसची किंमत 19,999 रुपये इतकी असणार आहे.