Business News | लक्षात ठेवा ! 1 ऑगस्टपासून बदलतील तुमच्या बँकेशी संबंधीत ‘हे’ नियम, खिशावर होईल थेट परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business News | सोमवारपासून वर्षाचा आठवा महिना म्हणजेच ऑगस्ट सुरू होत आहे. ऑगस्ट महिन्याच्या आगमनासोबत बँकिंग व्यवस्थेशी संबंधित अनेक नियम आणि बँक-एटीएमशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. या बदलामुळे तुम्हालाही काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. (Business News)

 

Bank of Baroda च्या ग्राहकांनी लक्ष द्यावे !

चेक क्लिअरन्सबाबत आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बँक ऑफ बडोदाने चेक पेमेंट नियमांमध्ये काही बदल केले आहेत. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकच्या पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम अनिवार्य असेल. याच्याशिवाय धनादेशाचे पेमेंट केले जाणार नाही. (Business News)

 

काय आहे पॉझिटिव्ह पे सिस्टम

देशातील मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी 2020 मध्ये धनादेशांसाठी ’Positive Pay System’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या सिस्टम अंतर्गत, चेकद्वारे 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्यासाठी काही महत्त्वाची माहिती आवश्यक असू शकते. या सिस्टमद्वारे चेकची माहिती मेसेज, मोबाईल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे दिली जाऊ शकते. चेकचे पेमेंट करण्यापूर्वी हे तपशील तपासले जातात.

 

ऑगस्टमध्ये 13 दिवस बँका बंद राहतील

ऑगस्ट महिन्यात सण आणि सुट्ट्यांमुळे बँका 13 दिवस बंद राहणार आहेत.
स्वातंत्र्य दिन 2022 (Independence Day 2022), रक्षाबंधन 2022 (Rakshabandhan 2022),
जन्माष्टमी 2022 (Janmashtami 2022) आणि गणेश चतुर्थी 2022 (Ganesh Chaturthi 2022) सारखे मोठे सण या महिन्यात आहेत.
त्यामुळे ऑगस्टमध्ये बँकेशी संबंधित काही काम असेल, तर सुट्टीचे दिवस नक्की जाणून घ्या.

 

Web Title : –  Business News | know about all new rules from 1 august and what will be changed from monday check details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा