बेरोजगारी वाढणार ! 2020 मध्ये 25 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार

ADV

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – बेरोजगारी मुद्द्यावरून विरोधकांनी अनेकदा मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या वर्षी संयुक्त राष्ट्राने केलेल्या एका अहवालात धक्कादायक बाब समोर आली आहे. २०२० या वर्षी बेरोजगारीमध्ये वाढ होणार असून या वर्षी २५ लाख नोकऱ्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गेली नऊ वर्षे जागतिक बेरोजगारीचे प्रमाण बहुतांश स्थिर आहे. मात्र जागतिक आर्थिक वाढ मंदावली आहे. याचाच अर्थ जागतिक स्तरावर कामगारांचे प्रमाण वाढत आहे, परंतु आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या रोजगारक्षम तरुणांसाठी पुरेशी नवीन रोजगार निर्मिती होत नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आयलओने जागतिक बाजारात २५ लाखांच्या बेरोजगारांची वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आयलओ ही एक संयुक्त राष्ट्र संघटना असून रोजगारास चालना देणे हा या संस्थेचा मूळ हेतू आहे.

बेरोजगारीचे सध्याचे प्रमाण
जगभरातील बेरोजगार : १८ कोटी ८० लाख
पुरेसा पगार न मिळणारे : १६ कोटी ५० लाख
रोजगाराचा शोध थांबवलेले किंवा रोजगारच न मिळालेले : १२ कोटी
एकूण : सुमारे ४७ कोटी

काय सांगितलंय या अहवालात नेमकं
संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आयएलओ) ‘द वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आऊटलूक : ट्रेंड्स २०२०’ हा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला. अहवालातील निष्कर्षानुसार, विकसनशील देशांमध्ये सन २०२० – २१ मध्ये बेरोजगारी प्रचंड वाढणार आहे. यामुळे सन २०३० पर्यंत जगभरातून गरिबीचे उच्चाटन करण्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –