अतिशय कमी भांडवलाचा ‘हा’ व्यवसाय करा अन् वर्षाला ८ लाख रूपये कमवा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्याला कमी गुंतवणूकीत चांगला व्यावसाय सुरु करायचा आहे का ?. आपल्याला यासाठी चांगले पर्याय सुचत नसतील तर बिझनेससाठी एक भन्नाट कल्पना आहे. ज्यात फक्त ४-४.५ लाखांच्या गुतंवणूक करून वर्षाला १० लाखांची कमाई करू शकता.

हा एक वेगळाच व्यावसाय आहे. तुम्ही कुकुटपालन या व्यावसायाविषयी ऐकलेच असेल. असाच काहीसा हा व्यावसाय आहे. रैबिट फार्मिंग असं या व्यावसायाचे नाव आहे. बाजारात सस्याचे मांस चांगल्या दरात विकले जाते. शिवाय सस्याच्या केसांपासून बनलेले ऊन यालाही बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे ससा पालन करून कशी आणि किती कमाई करता येईल याची माहिती तुम्हाला देणार आहे.

या व्यावसायात सुरुवातीला तुम्हाला ४ लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. हा व्यावसाय वेगवेगळ्या भागात विभागलेला आहे. त्यातील एका भागात ७ मादा ससे, आणि ३ नर ससे असतात. त्यासाठी ४ लाख ते ४.५० लाख रुपये खर्च होऊ शकते. त्यात १ ते १.५ लाख रुपये सस्यांचा पिंजरा, १ ते १.२५ लाख रुपये चारा आणि असा इतर २ लाख रुपयांचा समावेश यात होतो.

सस्यांच्या प्रजातीत नर आणि मादी हे ६ महिन्यानंतर प्रजननासाठी तयार होतात. त्यात मादी एका वेळी ६ ते ७ पिलांना जन्म देते. तसंच मादीचा गर्भधारणेचा काळ ३० दिवसांचा असतो. आणि होणाऱ्या पिलांचा वाढीचा काळ ४५ दिवसांचा असतो. त्यात ४५ दिवसात एका सस्याचे वजन २ किलोग्रॅम भरते. तेव्हा ते विकण्यासाठी तयार असतात.

या व्यावसायात फायदा कसा होतो, ते जाणून घेऊ
साधारणपणे एक मादी ससामुळे ५ मुले होतात. ज्यात ४५ दिवसात ३५० मुले असतील. एक युनिट भाग पिलांना जन्म देण्यासाठी ६ महिन्यात तयार होतात. ४५ दिवसांत या पिलांची किंमत २ लाखांपर्यंत होते. यांना प्रजनन, मांस आणि लोकर व्यवसायासाठी विकले जाते.

मादी ससा वर्षातून कमीत कमी ७ वेळा मुलांना जन्म देते. तथापि, मृत्यू, रोग अशा काही समस्या झाल्याच तर सरासरी वर्षातून ५ वेळा गर्भधारणा होते. त्यामुळे वर्षभरात सरासरी १० लाख रुपयांची आवक होते. त्यातील २ ते ३ लाख रुपये ससा पालनात गेले तर ७ लाख रुपयांचा निव्वळ नफा होत आहे. त्यातूनही सुरुवातीचे ४ लाख रुपये वजा केले तर ३ लाख नफा पहिल्या वर्षात होतो.

दरम्यान, तुम्हाला या व्यवसायाची अधिक माहिती नसेल तर रिस्क घेण्याची तयारी नसेल तर आपण याची फ्रेंचाईसही घेऊ शकतो. यात सुरुवातीला व्यावसायाबद्दलची सर्व माहिती व ट्रेनिंग दिली जाते. त्यामुळे हा पर्यायही उत्तम आहे. पुढे जाऊन आपण स्वतःचा व्यावसाय करू शकता.