New Business Opportunity : ‘या’ व्यवसायात फक्त 50 हजार रूपये ‘गुंतवूणक’ करा अन् ‘कमवा’ 2.5 लाखापेक्षा जास्त, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी सध्या लोक आरोग्याबात खुप काळजी घेत आहेत. यासाठी आहारात विविध प्रकारच्या भाज्यांच्या समावेश केला जात आहे. मशरूमसुद्धा अशीच एक आरोग्यदायी भाजी आहे. मशरूमध्ये अनेक महत्वाचे खनिज आणि व्हिटॅमिन आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियम भरपूर असते. याशिवाय, मशरूममध्ये कोलाइन नावाचे खास पोषक तत्व आढळते, जे मांसपेशीची सक्रियता वाढते. यामुळे मशरूम सध्या खुपच लोकप्रिय होत आहे. बाजारात याचा रिटेल भाव 300 ते 350 रुपये किलो आणि आणि घाऊक भाव 40 टक्के कमी असतो. यास मागणी जास्त असल्याने शेतकरी आपली पारंपारिक शेती सोडून मशरूमचे पिक घेत आहेत. मशरूमच्या शेतीबाबत जाणून घेवूयात सर्वकाही…

बटन मशरूमच्या शेतीसाठी कम्पोस्ट बनवले जाते. एक क्विंटल कम्पोस्टमध्ये दिड किलाग्रॅम बियाणे लावता येते. 4 ते 5 क्विंटल कम्पोस्ट बनवून सुमारे 2 हजार किलो मशरूम उगवतात. आता 2 हजार किलो मशरूम किमान 150 रुपये किलोच्या भावाने विकले तर सुमारे 3 लाख रुपये मिळतात. यातून 50 हजार रुपये खर्च म्हणून बाहेर काढले तर 2.50 लाख रुपये मिळतात. मात्र, याचा खर्च 50 हजार रुपयांपेक्षा कमी येतो.

मशरूमच्या शेतीचे ट्रेनिंग
सर्व अ‍ॅग्रीग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आणि कृषि संशोधन केंद्रामध्ये मशरूमच्या शेतीचे ट्रेनिंग दिले जाते. मोठ्या प्रमाणात शेती करणार असाल तर ट्रेनिंग आवश्यक आहे. प्रति वर्ग मीटरमध्ये 10 किलोग्रॅम मशरूम सहज उगवता येतात. किमान 40 बाय 30 फुटच्या जागेत दोन-तीन फुट रूंद रॅक बनवून मशरूम उगवता येतात.

कम्पोस्ट बनवण्याची कृती
कम्पोस्ट बनवण्यासाठी धान्याचा पेंढा भिजवावा लागतो आणि एका दिवसानंतर यामध्ये डीएपी, यूरिया, पोटॅश, गव्हाचा कोंडा, जिप्सम आणि कार्बोफ्यूडोरन मिसळून, ते कुजण्यासाठी ठेवले जाते. सुमारे दिड महिन्यानंतर कम्पोस्ट तयार होते. आता शेणखत आणि माती बरोबरीने मिसळून सुमारे दिड इंच जाड पसरवून, त्यावर कम्पोस्टचा दोन-तीन इंचाचा थर चढवला जातो. यामुळे ओलसरपणा कायम राहाते. ओलसरपणा कायम राहावा म्हणून दिवसातून दोन ते तीनवेळा पाण्याच स्प्रे केला जातो. त्यावर एक दोन इंचाचा कंपोस्टचा आणखी थर लावला जातो आणि अशाप्रकारे मशरूमचे पिक नंतर येऊ लागते.