‘कोरोना’च्या संकटात नोकरी गेली तर ‘नो-टेन्शन’, ‘या’ व्यावसायातून होईल दरमहा मोठी ‘कमाई’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस संकटात लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, तर लाखो लोकांच्या पगारात कपात झाली आहे. अजूनही काही लोकांच्या नोकर्‍यांवर टांगती तलवार आहे. श्रीमंत असो की, गरीब प्रत्येकला कोरोनाचा फटका बसला आहे. अशा स्थितीत तुमच्याकडे काम नसेल आणि तुमची जमीन असेल तर, कमी पैसे लावून जास्त पैसे देणारा बिजनेस करून तुम्ही टेन्शन दूर करू शकता. या बिजनेसची खासियत ही आहे की, तो सुरू करण्यासाठी सरकारची मदत मिळते. भारत सरकारच्या पशुपालन, डेअरी आणि मत्स्य पालन मंत्रालयाने काही अशा स्कीम सुरू केल्या आहेत, ज्या आर्थिकदृष्ट्या मागास आणि बेरोजगारांसाठी खुप लाभदायक आहेत. जाणून घेवूयात तुम्ही कोणता बिजनेस करू शकता.

जर तुम्ही गुंतवणूक करून बिजनेस करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ट्राउट मासे पालनावर विचार करू शकता. या बिजनेसला नाबार्डद्वारे 20 टक्के सबसिडी दिली जाते. नाबार्डनुसार, केवळ 2.30 लाख रुपयांमध्ये ट्राउट फार्मिंग सुरू करता येईल. जर तुम्हाला 20 टक्के सबसिडी मिळाली तर तुम्हाला केवळ 1.80 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. नाबार्डच्या रिपोर्टनुसार, ट्राउट एक प्रकारची मच्छी आहे, जी स्वच्छ पाण्यात आढळते. भारताच्या काही राज्यात ही मच्छी मोठ्याप्रमाणात आढळते.

किती गुंतवणुकीत सुरू होईल फार्मिंग

नाबार्डच्या रिपोर्टनुसार, 15 बाय 2 बाय 1.5 मीटरच्या तलावासाठी सुमारे 1 लाख रुपयांचा खर्च येईल. तर सुमारे 6000 रुपये इक्विपमेंटसाठी जातील, ज्यामध्ये हँड नेट, बादली, टब, थर्माकोल बॉक्सचा समावेश आहे. तर 22,500 रुपयांमध्ये बीज आणि 1.45 लाख रुपये खाद्यासाठी खर्च होतील. जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर पहिल्या वर्षाचे व्याज 26,700 रुपये होईल. अशापद्धतीने तुम्हाला वर्षात सुमारे 3 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ज्यावर तुम्हाला 20 टक्के म्हणजे सुमारे 60 हजार रुपयांची सबसिडी दिली जाईल. जर तुम्ही एससी किंवा एसटी कॅटेगिरीतील असाल तर तुम्हाला 25 टक्के सबसिडी मिळेल.

एवढे मिळेल उत्पन्न

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पहिल्या वर्षी तुमची विक्री सुमारे 3.23 लाख रूपये होईल, परंतु पुढच्या वर्षी तुमची कॅपिटल कॉस्ट कमी होईल आणि तुमची विक्री 3.50 लाख रुपये होईल.